![]()
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. नानांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत भावुक शब्दांत नानांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाना पाटेकर हे केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर समाजाप्रती अफाट संवेदनशीलता असलेला एक उत्तम माणूस होते, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना गडकरींनी नानांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीतील ‘तो’ जॅकेटचा किस्सा नाना पाटेकरांसोबतचे कौटुंबिक संबंध सांगताना गडकरींनी एक खास आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एकदा नाना दिल्लीत आले होते. त्यावेळी दिल्लीत कडाक्याची थंडी होती आणि नाना केवळ एका कुर्त्यावर होते. मी त्यांना म्हणालो की, नाना तुम्ही मुंबईत राहता, तुम्हाला दिल्लीच्या थंडीचा अंदाज नाही. त्यावर नाना म्हणाले, ‘अरे काही होत नाही.’ मग मी आत गेलो आणि माझे एक वुलनचे जॅकेट त्यांना आणून दिले. ते सुरुवातीला नको म्हणत होते, पण त्यांनी ते घातले. जॅकेट घातल्यावर नाना मला म्हणाले, ‘तुझं जॅकेट मला अगदी फिट बसलं, कारण आपल्या दोघांचे विचारही एकसारखे आहेत, त्यामुळे जॅकेटही फिट झालं.’ ही गोष्ट मला आजही प्रकर्षाने आठवते.” जलसंवर्धन आणि कुष्ठरुग्णांसाठी मोठे योगदान नानांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना गडकरी म्हणाले, “नानांनी जलसंवर्धनासाठी आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे काम केले ते अभूतपूर्व आहे. ‘धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावा,’ हा विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. याशिवाय, बाबा आमटे यांच्या कुष्ठरुग्णांच्या आश्रमात ते दरवर्षी जाऊन राहायचे. साहित्यिक, कवी आणि बाबा आमटेंसारख्या समाजसेवकांबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती.” कारगिलमधील राष्ट्रभक्तीला सलाम नानांचे व्यक्तिमत्त्व केवळ अभिनयापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्यातील देशभक्तीचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, “जेव्हा कारगिलचे युद्ध झाले, तेव्हा नाना चक्क सैनिकाचा युनिफॉर्म घालून तिथे पोहोचले होते. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वीरवृत्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा परिचय दिला आहे. समाजातील वंचित, शोषित, शेतकरी आणि गरीब लोकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड संवेदनशीलता होती.” अचानक मृत्यू अनाकलनीय नाना पाटेकर यांच्या आरोग्याविषयी बोलताना गडकरींनी धक्का व्यक्त केला. “नानांचे आरोग्य अतिशय उत्तम होते, ते नियमित व्यायाम करत असत. इतके तंदुरुस्त असतानाही त्यांचा अशाप्रकारे अचानक झालेला मृत्यू अनाकलनीय आहे. आज सकाळपासूनच आम्ही सर्वजण अस्वस्थ आहोत. पण शेवटी हीच ईश्वराची इच्छा असावी. त्यांच्या जाण्याने आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी आपल्या जिवलग मित्राला अखेरचा निरोप दिला. ———– संबंधित बातम्या वाचा.. नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन: 100 हून अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय, 4 फिल्मफेअर पुरस्कार; कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा
Source link