![]()
औंढा नागनाथ शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी ता. १३ सकाळी आकरा वाजता नगर पंचायत कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला मागण्यांचे निवेदन चिटकविण्यात आले. औंढा नागनाथ शहरातील नागरीकांकडून एक महिन्याची नळपट्टी आकारून महिन्यातून दोनच वेळेस पाणी येत अाहे. त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. शहरात ळे पूर्वीप्रमाणे दोन दिवस आड करून पाणी पुरवठा करावा, त्याप्रमाणे नळपट्टी आकारण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या दुरुस्त करून नियमितपणे कचरा संकलन करावा, शहरातील नालेसफाई व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करावे, हरविलेल्या जन्मनोंदणीसह महत्त्वाच्या दस्तऐवजांचा शोध घेऊन जबाबदारी निश्चित करावी, नगरपंचायतीला प्राप्त निधीतून प्रलंबित विकासकामे तातडीने सुरू करावीत, शहरातील मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीची कठोर कार्यवाही करावी, नगरपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात शिस्त व पारदर्शकता आणावी यासह इतर मागण्यांचा समावेश होता.
दरम्यान, आज सकाळी आकरा वाजता जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, उपजिल्हाप्रमुख जी. डी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख संजय भामीरगे, अलीम खातीब, चंद्रमुनी पाईकराव, मधुकर गोरे, सुनील खंडागळे,रवी डोंगरदिवे,आकाश सुतारे, संतोष रेनके, मुरली गिरी, राम काळे, अफसर पटेल, शेख साजिद, सुनील जोंधळे, सर्जेराव काचगुंडे ,पांडुरंग मेटकर, हानवंता गायकवाड, गणेश पानबुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकविण्यात आले.
Source link
औंढा नागनाथ येथे नगर पंचायतीसमोर ठाकरे गटाचे ढोल बजावो आंदोलन:दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्याची मागणी, मुख्याधिकारी गैरहजर असल्याने खुर्चीला चिटकविले निवेदन