Headlines

मंत्र्यांनी 5 हजारात दिवाळी साजरी करून दाखवावी:त्यांना मी 1 हजार बक्षीस देतो, दुष्काळी मदतीवरून अंबादास दानवेंचे सरकारला आव्हान




राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम (आगाऊ) मदतीवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत, सरकारला खुले आव्हान दिले आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगावे, त्या मंत्र्याच्या खात्यात आम्ही 5 हजार रुपये जमा करतो, त्यांनी यात दिवाळी साजरी करून दाखवावी’, असे थेट चॅलेंज दानवे यांनी दिले आहे. अंबादास दानवेंचे सरकारला चॅलेंज काय? अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट करत राज्य सरकारच्या 5 हजार रुपयांच्या मदतीवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या मंत्र्याच्या खात्यावर आम्ही शिवसैनिक 5,000 रुपये जमा करतो. मंत्री महोदयांनी या पैशात दिवाळीत खालील गोष्टी करून दाखवाव्यात:” दानवे यांनी पुढे म्हटले आहे की, “हे सर्व याच पाच हजारात करून/आणून दाखवावे; त्याला मी आणखी एक हजार रुपयांचे अतिरिक्त बक्षीस देईन! काय ‘भोपळाछाप’ सरकार आहे! हे पैसे अंतिम मदतीतून कापून घेऊ नका म्हणजे झालं.” राज्य सरकारचा निर्णय काय होता? दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने काल घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय आहेत. राज्यातील वाढता दुष्काळ पाहता, सरकारने पूर्वीच्या २६५ तालुक्यांमध्ये आणखी ४० तालुक्यांची भर घालत एकूण ३०५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी मदतीची कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्राचा प्रत्यक्ष निधी हातात येण्यास डिसेंबर महिना उजाडेल. तोपर्यंत बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार रुपयांचा अग्रीम निधी थेट वर्ग करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. चारा खरेदी आणि अवैध पाणी उपशावर कारवाई: या मदतीव्यतिरिक्त, राज्य सरकारने आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यात भूजल पातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी तब्बल १६ हजार अवैध पाणी उपसा जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच, दुष्काळात शेतकऱ्यांनी घेतलेला संपूर्ण चारा शासन हमीभावाने खरेदी करणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ———————– ही बातमी पण वाचा.. राज्य सरकारचा बळीराजाला दिलासा: दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; चारा हमीभावाने खरेदीसह मुख्यमंत्री फडणवीसांचे 4 मोठे निर्णय राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी मदतीची कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी येण्यास डिसेंबर उजाडतो; परंतु यंदा बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार रुपयांचा अग्रिम (आगाऊ) निधी थेट वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासाठी 16 हजार अवैध उपसा जोडण्या तोडण्यात आल्या असून, दुष्काळात शेतकऱ्यांनी घेतलेला संपूर्ण चारा शासन हमीभावाने खरेदी करणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *