![]()
तिवसा तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांचे १५०० रुपये प्रति महिना अनुदान रखडले आहे. यामुळे वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांवर आर्थिक संकट आले आहे. या योजनांमधील सुमारे २०० लाभार्थ्यांना दरमहा २ लाख रुपये वितरित केले जातात. अनुदान न मिळाल्याने त्यांचे दैनंदिन खर्च, औषधोपचार आणि उदरनिर्वाह थांबला आहे. अनेक लाभार्थी वारंवार बँक आणि तहसील कार्यालयात चौकशीसाठी जात आहेत, पण त्यांना निराशाच मिळत आहे. दसरा आणि दिवाळी तोंडावर असतानाही अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या महागाईत सणांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे त्यांना कठीण झाले आहे. यावर तिवसा तहसीलदार मयूर कडसे यांनी सांगितले की, रखडलेले अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
Source link
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान तीन महिन्यांपासून रखडले:दसरा-दिवाळी तोंडावर असतानाही निराधार लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना