Headlines

सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा:आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास, न्यायालयाला धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हावी- संजय राऊत




तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे असे 1947 नंतर रा.स्व.संघाने माणले होते. त्यांनी त्यांच्या मुख्यालयावर जवळपास 40 ते 45 वर्षे तिरंगा फडकवला नव्हता. त्यांच्या दृष्टीने तिरंगा फडकवणे हा गुन्हा होता. आमच्या दृष्टीने तो सन्मान आहे, सीजेपीने तिरंगा फडकवला असेल तर अमित शहा आणि पोलिसांना राग येण्याचे काय कारण आहे? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा. आम्ही कोर्टाकडून अपेक्षा ठेवणार नाही तर कोणाकडून अपेक्षा ठेवणार. न्याय मिळावा म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जात आहोत. आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे राऊतांनी म्हटले आहे. तर न्यायालयाला धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्ट ही देशातील सर्वात महत्त्वाची संविधानिक संस्था आहे. सरकारकडून संविधानाचा जो अपमान होत आहे त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांमधील 13 कोटी नावे काढली आहेत ते सुद्धा संविधानिक पदावर बसले आहेत, ते भाजपचे एजंट आहे. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे ते जर संविधान आणि मतदारांचा अपमान करत असेल तर लाखो लोकं सुप्रीम कोर्टाच्या दारात उभे राहिले, कोर्टाने आमची याचिका दाखल करुण घेतली, आम्ही कोर्टाचा आदर करतो. न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जातो संजय राऊत म्हणाले की, देशातील 13 कोटी मतदारांना वगळण्यात आले आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. एसआयआरमुळे देशात अनागोंदी माजली आहे त्यांना न्याय द्यावा. अंकिता भंडारीच्या खून खटल्यामध्ये केंद्र सरकारने ज्या व्हीआयपीला संविधानाचे सरंक्षण दिले आणि राज्यपाल केले, त्या अंकिता भंडारीच्या माता-पित्यांना न्याय द्या. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला गेली साडेचार वर्षे झाली आम्ही सुप्रीम कोर्टात लढतो आहोत. 4 मुख्य न्यायाधीश बदलले, घटना द्रोही सरकार महाराष्ट्रात बसवले गेले पण आम्हाला न्याय मिळाला नाही. सुप्रीम कोर्ट हे कोट्यावधी अन्यायग्रस्त जनतेच्या आवाज आहे. म्हणून आम्ही सर्व जण त्यांच्याकडे जात असतो. आम्हाला न्याय मिळेल ही खात्री संजय राऊत म्हणाले की, देश आज खदखदतो आहे कारण अमित शहांनी सर्व संविधानिक संस्थावर दबाव आणला आहे. ते धमक्या देत आहे. न्यायालय जे म्हणतय की आम्हाला धमक्या देऊ नका त्यांचा रोख अमित शहा यांच्याकडे असेल. ते गद्दारांना दबाव आणत हवा तो न्याय मिळवून देत आहेत. यावर सुद्धा न्यायव्यवस्थेला एक भूमिका घ्यावी लागेल. माझ्या पक्षाला न्याय मिळाला पाहिजे, मला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल. सुप्रीम कोर्टाकडून कोणाचे नाव घेण्यात आले नसले तरी सुप्रीम कोर्ट बार असोशिएशन यांनी माझे नाव घेतले आहे. न्यायालयात खटला चालला तर आम्ही लढू पण माझी तशी काही भावना नव्हती. आणि मी सुप्रीम कोर्टाची माध्यमांसमोर माफी मागितली आहे. फडणवीसांनी शुद्धीकरण म्हणजे कास समजून घ्यावे संजय राऊत म्हणाले की, मृत पावलेल्या मतदारांच्या ठिकाणी जात भाजपचे लोकं मतदान करतात. हे रेकॉर्डवर आले आहे. अनेक लाखो जिंवत लोकं आहेत त्यांना मृत दाखवले आहे. हे सगळे मेलेले जिंवत झालेले लोकं आदित्य ठाकरे, राहुल गांधी यांनी दाखवले आहेत. याला शुद्धीकरण म्हणतात का? शुद्धीकरण म्हणजे काय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. घोटाळ्याचा आता नवीन मार्ग मुख्यमंत्र्यांना शोधावा लागेल. त्यांनी निवडणूक आयोगाला घरगडी समजू नये. हे ही वृत्त वाचा नात्यातील तरुणीशी का बोलतो म्हणत छातीमध्ये चाकू भोसकून तरुणाचा खून:संभाजीनगरच्या गारखेड्यातील साईनगर भागातील घटना, बीडला पळालेल्या आरोपीस अटक
नात्यातील एका तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून एका 19 वर्षांच्या तरुणावर एकाने चाकूचे 3 वार करून त्याची हत्या केली. गारखेड्यातील साईनगर भागात बुधवारी ( 14 ऑक्टोबर) रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तौसिफ शमीम शेख (19, रा. साईनगर, गल्ली क्र. 3) असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर खासगी बसने थेट बीडला पळून गेलेल्या आदित्य अशोक शेळके (19) या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ आणि आदित्य हे एकाच परिसरात राहणारे आहेत. बुधवारी रात्री गारखेडा भागात आदित्यच्या नात्यातील तरुणीशी तौसिफ बोलत होता. हे पाहताच आदित्यने तौसिफला हटकले. ‘तू माझ्या नात्यातील मुलीशी का बोलतोस?’ यावरून दोघांमध्ये झटापट झाली. यानंतर रात्री 10.30 ला तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मीर शेख हे नूर मशिदीच्या पाठीमागे बसले असताना आदित्य चाकू घेऊन तेथे आला. काही समजण्याच्या आतच त्याने तौसिफच्या छातीत, नाकावर आणि डोक्यावर चाकूने तीन वार केले. जखमी तौसिफला आधी एमजीएममध्ये तर नंतर घाटीत दाखल केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *