Headlines

"तुझा नेक्स्ट गेम…", प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी!:ठाण्यात तणावात भर; प्रताप सरनाईकांनी घेतली कुटुंबीयांची भेट




शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर हिच्या मोबाईलवर “तुझा नेक्स्ट गेम” असा जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या धमकीमुळे आधीच दुःखात असलेले पूर्णेकर कुटुंबीय आता तीव्र भीतीच्या छायेत वावरत आहे. पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या शिवसेनेतील पदाधिकारी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचे गंभीर आरोप होत असून, पोलिसांकडून या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर संशयित आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कुटुंबाकडून केली जात आहे. प्रताप सरनाईकांनी घेतली पूर्णेकर कुटुंबाची भेट या गंभीर घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. तसेच, मंत्री प्रताप सरनाईक यांनीही घरी जाऊन सांत्वन करत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असली तरी पुतणीला आलेल्या धमकीमुळे कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. ‘आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आहोत’ यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, तुमच्यावर अन्याय होणार नाही, जे राजकारण झाले, प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचे प्रत्येकाला दुःख आहे. काही लोकांनी राजकारण केले, पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत, माहोल असा केला होत की आम्ही या गोष्टी टाळत होतो. रामसोबत परवा बोललो, आज बोललो. आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आहोत, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले आहे. पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, प्रताप सरनाईक वैयक्तिक सगळे वकील उभे करतो, ज्यांनी इथे येऊन राजकीय फायदा घेतला हे तुम्हाला पण माहीत आहे. मी कौटुंबिक भावनेतून बोलत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करून घेऊ नका. 100 वेळा आम्ही फोन केल्यावर जे ठाण्यात येत नाहीत, ते राजकारण करायला ठाण्यात आले, अशी टीका सरनाईक यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *