बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत थोडक्यात बचावला. रविवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता फुटबॉल क्लबमधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत टायगरच्या चालकासह दोन जण जखमी झाले आहेत.
.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मध्यरात्री टायगरच्या घरी पोहोचले आणि त्याची विचारपूस केली. टायगरच्या घरातून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्याच्या खांद्यावर आणि छातीवर ड्रेसिंग, तसेच उजव्या हातावर पट्टी बांधलेली दिसत होती. त्याची आई आयशा श्रॉफही यावेळी उपस्थित होती.
————–
संबंधित बातम्या वाचा..
टायगर श्रॉफवरील गोळीबाराचे 4 VIDEO: शूटर्सचा गोळीबार, ड्रायव्हर जखमी; हिरो ड्रायव्हिंग सीटवर बसला अन् गाडी घेऊन निघून गेला

अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी मुंबईत गोळीबार झाला. या घटनेत त्यांचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाली. टायगर आपल्या ड्रायव्हरला घेऊन रुग्णालयात पोहोचला. पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर सुरक्षित आहे. पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. संपूर्ण घटनेचे 4 व्हिडिओ समोर आले आहेत. सविस्तर वाचा
मुंबईत टायगर श्रॉफवर 5 राउंड गोळीबार, अभिनेता सुरक्षित, लॉरेन्स गँगने जबाबदारी स्वीकारली

अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी 7 वाजता मुंबईत गोळीबार झाला. टायगर फुटबॉल खेळून परतत असताना त्यांची कार जुहूच्या पुष्पा पार्कजवळ थांबली. संपूर्ण बातमी वाचा…