Headlines

राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप:म्हणाले- टायगर श्रॉफच्या भेटीला वेळ, पण ठाण्यात घराजवळ असलेल्या प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांसाठी नाही?




जुहू येथे अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वांद्रे येथे जाऊन त्याची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे दिवंगत नेते प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी या भेटीवर तीव्र संताप व्यक्त केला असून, ‘उपमुख्यमंत्र्यांना टायगर श्रॉफला भेटायला वेळ आहे, पण ठाण्यात आमच्या घरी यायला वेळ नाही,’ अशी घणाघाती टीका केली आहे. टायगर श्रॉफच्या घरी जाऊन विचारपूस टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारात तिघे जखमी झाले होते. रुग्णालयातील उपचारानंतर टायगरला त्याच्या वांद्रे येथील घरी आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रात्रीच त्याच्या निवासस्थानी जाऊन टायगरची आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. राम पूर्णेकरांचा सोशल मीडियावरून घणाघात उपमुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेवर राम पूर्णेकर यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ठाण्यातील हत्येला १९ दिवस उलटून गेले तरी कुटुंबीयांची साधी भेट न घेणारे नेते टायगर श्रॉफची विचारपूस करायला त्याच्या घरी पोहोचले. ठाण्यात अगदी घराजवळ असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या भेटीला मात्र त्यांना वेळ नाही. यालाच ‘शिवसेना मीनाक्षी राजा पर्व’ म्हणतात.” १९ दिवसांनंतरही कुटुंबीयांची उपेक्षा प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या होऊन आता १९ दिवस उलटले आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांनी वारंवार मागणी करूनही सत्ताधारी गटातील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप त्यांची भेट घेतलेली नाही, असा आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे. अभिनेत्यासाठी दाखवलेली तत्परता आणि पूर्णेकर कुटुंबीयांकडे केलेले दुर्लक्ष यावरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राम पूर्णेकर यांच्या या आक्रमक पोस्टनंतर आता राजकीय वर्तुळातून आणि शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राम पूर्णेकरांची पोस्ट..
——————– ही बातमी पण वाचा.. टायगर श्रॉफवर गोळीबार, हातावर-छातीवर पट्ट्या:एकनाथ शिंदेंनी घेतली भेट; आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले
मुंबईच्या जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफचे फोटो समोर आले आहेत. त्याच्या हातावर आणि छातीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री उशिरा त्याच्या घरी भेट दिली. त्यांनी सांगितले की, बंदुकीच्या दारूगोळ्यामुळे आणि काचेच्या तुकड्यांमुळे टायगरच्या हाताला दुखापत झाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *