Headlines

खाजगी शिक्षकांना आता 2 ऐवजी 4 तासांची सुटी:अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी खाजगी आस्थापनांमधील शिक्षकांना आता ४ तासांची विशेष सवलत मिळणार आहे. पूर्वी ही सवलत २ तासांची होती, ती आता वाढवण्यात आली आहे. मतदान येत्या शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. शासकीय सेवेतील शिक्षकांना निवडणुकीसाठी भरपगारी रजा जाहीर झाली आहे. मात्र, खाजगी आस्थापनांमधील मतदारांना २ तासांची सुटी दिली जात होती. काही मतदान केंद्रांचे अंतर जास्त असल्याने प्रवासाला वेळ लागतो. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी ४ तासांची सवलत देण्यास सांगितले. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी अमरावतीसह इतर विभागांमधील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत होईल, तर मतमोजणी २७ ऑक्टोबरला आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी खाजगी आस्थापनांना ४ तासांची सवलत देण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *