Headlines

अमरावतीत भेसळयुक्त दूध, खवा, मिठाईची विक्री:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिवाळीपूर्वी एफडीएला तपासणीची मागणी केली




क्रांतिकारी शेतकरी संघटनेने अमरावतीत भेसळयुक्त दूध, खवा, मिठाई विकली जात असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील सर्व डेअरी, खवा व मिठाई दुकानांची तपासणी करावी, अशी मागणी संघटनेने केली. संघटनेचे विदर्भप्रमुख अमीत अढाऊ यांनी सोमवारी एफडीएचे सहायक आयुक्त विवेक चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी आठवडाभरात आस्थापनांची तपासणी, नमुने प्रयोगशाळेत पाठवणे आणि विना परवाना दुकाने सील करण्याची मागणी केली. संघटनेनुसार, अमरावतीत दररोज लाखो लिटर भेसळयुक्त दूध, शिळी मिठाई, विना लेबल सॉस आणि उघड्यावरचे केक-पेस्ट्री विकले जातात. शहराची दुधाची मागणी दीड ते दोन लाख लिटर आहे, पण जिल्ह्यात तेवढे उत्पादन नाही. हे दूध अस्वच्छ कॅनमधून तपासणीशिवाय शहरात येते. याच निकृष्ट दुधापासून खवा व मिठाई तयार होते. प्रशासनाने सात दिवसांत कारवाई न केल्यास ‘भेसळयुक्त थाळी आंदोलन’ करण्याचा इशारा अढाऊ यांनी दिला. भेसळयुक्त अन्न विक्री हा कायद्यानुसार जन्मठेपेपर्यंत शिक्षेचा गुन्हा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *