Headlines

मेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी सीईओ सत्यम गांधी सक्रिय:आरोग्य यंत्रणेला अलर्ट करत घरोघरी जाऊन गरोदर मातांचा आढावा घेतला




मेळघाटातील बालमृत्यू कमी करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी आरोग्य यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली. अलिकडेच सीईओ गांधी यांनी वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध गावांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी अतिजोखमीच्या गरोदर मातांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे उपस्थित होते. दौऱ्याची सुरुवात वैरागड अंतर्गतच्या चटवाबोड गावातून झाली. येथे गांधी यांनी पुष्पा गंगाराम चतुर या गरोदर मातेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. गरोदरपणातील धोक्याची लक्षणे, रुग्णालयातील प्रसूतीचे महत्त्व आणि योग्य आहाराबाबत त्यांनी समुपदेशन केले. रंगूबेली येथे ‘मिशन २८’ अंतर्गत पाहणी व समुपदेशन झाले. कविता प्रकाश उईके यांच्या निवासस्थानी भेट देऊन ‘अमृत आहार’ योजनेच्या लाभाबाबत विचारपूस केली. आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *