Headlines

शिक्षक निवडणुकीला जाहीर प्रचाराचे बंधन:आज दुपारी ४ वाजल्यापासून प्रचार थांबला, उद्या सभा घेता येणार नाही




शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचारावर निर्बंध आले आहेत. आज, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून हा प्रचार थांबला आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वी ४८ तास आधी जाहीर प्रचार करता येत नाही. त्यामुळे उद्या, गुरुवार, २२ ऑक्टोबरला कोणत्याही उमेदवाराला जाहीर सभा किंवा मेळावा घेता येणार नाही. या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान दुपारी ४ वाजता संपणार असल्याने, त्यापूर्वीचे ४८ तास आज दुपारी ४ वाजल्यापासून सुरू झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही माहिती दिली. भारत निवडणूक आयोगानेच हा नियम लागू केला असून, आदर्श आचारसंहितेतही याचा उल्लेख आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *