Headlines

अमरावतीत एकाच दिवशी 9 बालकांना मिळाले नवीन कुटुंब:जिल्हाधिकारी येरेकर यांनी दत्तक प्रक्रियेचे आदेश मंजूर केले, आयुष्यात आली नवी आशा




अमरावती जिल्ह्याने दत्तक विधान प्रक्रियेत चांगली कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी ९ दत्तक प्रकरणांमध्ये आदेश मंजूर केले. यामुळे नऊ बालकांना नवीन कुटुंब आणि आनंदाची संधी मिळाली. ही कार्यवाही केवळ प्रशासकीय नसून, पालकांच्या संगोपनापासून वंचित बालकांना कायमस्वरूपी प्रेमळ कुटुंब देण्यासाठी हे संवेदनशील पाऊल आहे. यामुळे मुलांना सुरक्षित आणि स्थिर कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले, एकाच दिवशी नऊ दत्तक आदेश मंजूर होणे समाधानाची बाब आहे. बालकांचे संस्थात्मक संगोपन करण्याऐवजी त्यांना कुटुंबाधारित संगोपन देणे महत्त्वाचे आहे. यात बालकाचे हित, पालकांची पात्रता व कागदपत्रांची पडताळणी होते. या प्रक्रियेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे आणि विशेष दत्तक संस्थेच्या अधीक्षक सिस्टर ट्रीझा यांनी समन्वय साधला. भूषण कावरे यांनी कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *