- Marathi News
- National
- Nuclear Power Plant Security Now With ‘hardware’ Technology, Protection From Cyber Attacks, No Fear Of Software Crashes
नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अणुऊर्जा प्रकल्पांमधील सॉफ्टवेअर क्रॅश आणि सायबर हल्ल्यांच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी भारतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात येत आहे. रशियामध्ये बनवण्यात आलेले हे हार्डवेअरआधारित तंत्रज्ञान तामिळनाडूत सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात बसवले जात आहे.
रशियन अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उपकरणांचे सुमारे ३०० संच पाठवले आहेत. ही यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत मायक्रोप्रोसेसर व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरशिवाय कार्य करते. सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करणे हा यामागचा उद्देश आहे, जेणेकरून सायबर हल्ला किंवा कोणत्याही तांत्रिक बिघाडामध्येही सुरक्षा यंत्रणेवर परिणाम होणार नाही. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच त्यांना युनिट ३ आणि ४ च्या सुरक्षा यंत्रणेत समाविष्ट केले जाईल.
धोके अनेक… १० वर्षांत दोन मोठे सायबर हल्ले झाले
२०१९ मध्ये या प्रकल्पाच्या प्रशासकीय नेटवर्कवर उ. कोरियन हॅकर गट ‘लझारस’शी संबंधित ‘डिट्रॅक’ मालवेअरद्वारे घुसखोरी झाल्याचे समोर आली होती. अलीकडेच ‘वर्ल्ड लीक्स’ रॅन्समवेअर ग्रुपने डार्क वेबवर कुडनकुलम प्रकल्पाच्या १९,००० फायली लीक झाल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याची पुष्टी होऊ शकली नाही.
तिरुनेलवेली जिल्ह्यातील या प्रकल्पाची क्षमता ६,००० मेगावॅट आहे. राज्यातील वीज पुरवठ्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रकल्पास रशियाचे सहकार्य आहे.
प्रणाली मायक्रोप्रोसेसर, सॉफ्टवेअरशिवाय चालेल
आधी काय अडचण होती: संगणक सॉफ्टवेअर व मायक्रोप्रोसेसरमधील कोडिंगमध्ये त्रुटी आल्यास, ऑपरेटिंग सिस्टिम क्रॅश झाल्यास वा तांत्रिक अडचणीत सुरक्षा सिग्नलचे प्रोसेसिंग थांबण्याचा धोका असतो. एका युनिटमध्ये बिघाड झाल्यास पूर्ण मध्यवर्ती यंत्रणा एकाच वेळी ठप्प होऊ शकत होती, कारण त्यांची सुरक्षा प्रणाली डिजिटल कोडिंगवर अवलंबून होती.
नवीन प्रणालीत काय वेगळे: यामध्ये नॉन-प्रोग्रामेबल मॉड्यूलचा वापर केला आहे. म्हणजेच आता ही उपकरणे मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअरशिवाय थेट हार्डवेअर सर्किटच्या आधारे काम करतील. याने तांत्रिक बिघाड किंवा सॉफ्टवेअर क्रॅशच्या स्थितीत प्रकल्पाच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही.
स्वयंचलित सुरक्षा: रिॲक्टरमध्ये निश्चित मर्यादेपेक्षा जास्त तापमान किंवा दाब वाढल्यास ही यंत्रणा तातडीने सक्रिय होते व बोरॉन इंजेक्शन पंपासारख्या आपत्कालीन उपकरणांना आदेश पाठवते. याने रिॲक्टर आपोआप थंड होऊ लागतो व मोठा अपघात टळतो.
सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा: प्रोग्रामिंग नसलेले हार्डवेअर सर्किट असल्याने या सुरक्षा प्रणालीत बाहेरून कोणतीही डिजिटल, सायबर घुसखोरी करणे कठीण आहे.