![]()
बिअर बारला प्रोटेक्शन देण्याच्या वर्चस्ववादातून संभाजीनगरात भररस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आली. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली, त्यानंतर तो ठार झाला की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा यू-टर्न घेऊन आरोपी घटनास्थळी गेला. गाडीतून खाली उतरून, लाकडी दांड्याने मारून पळ काढून तो सिडको ठाण्यात हजर झाला. ही घटना गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास एन-७ रोडवरील एसबीआय बँकेच्या समोर घडली. देवेश ऊर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (३४, रा. एन-७) असे यातील मृताचे नाव आहे, तर पवन दिलीप पाराशर (रा. एन-७) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली. बंटीची हत्या करण्यासाठी त्याचा दोन दिवसांपूर्वीचा जिममधील व्हिडिओ कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्याची जिम कुठली व तो कधी जिमला जातो ही माहिती मिळाल्याने आरोपीने त्याची रेकी पूर्ण करून थंड डोक्याने हत्या केली. दर दोन वर्षांनी दीक्षित कुटुंबात एकाचा मृत्यू बंटी त्याचे आई, वडील, दोन भावांसह एन-७ मध्ये राहायचा. २०२० साली त्याची आई, २०२२ साली त्याचे वडील तर २०२४ मध्ये त्याच्या एका भावाचे निधन झाले. बंटीच्या घरी त्याची पत्नी, एक कन्या, भाऊ व भावजय आहे. भाईगिरीमुळे आरोपी पवनचे नेहमीच वाद आरोपी पवन पाराशरचा १० महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून तो सुरळीत कामाला लागल्याची चर्चा होती. मात्र, महिनाभरापूर्वी त्याची वागणूक बिघडल्याचे पाहून पत्नी माहेरी गेली होती. त्याच काळात गणेशोत्सव व नवरात्र उत्सव आल्याने पुन्हा एकदा भाईगिरीचा ट्रेंड पवनने चालवला होता. त्यातूनच या वादांना सुरुवात झाली होती. या वादातूनच वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने पवनचे बंटीसोबतही खटके उडाल्याचे समजते. वादातून पवनसह तिघांनी रचला हत्येचा कट 1. आरोपी पवन व मृत बंटी दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्यात व्यावसायिक शीतयुद्धाला सुरुवात झाली होती.
2. त्यांच्यात दांडिया व रावणदहन कार्यक्रमातून पुन्हा एकदा वाद झाला होता. त्या वेळी त्यांच्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळीचा राग पवनच्या डोक्यात होता.
3. पवन, त्याचा १ नातलग व साथीदार या तिघांनी ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत कट रचला.
4. हत्येपूर्वी आरोपीने बंटीचे सोशल मीडिया प्रोफाइलही डिलीट केले.
Source link
जिममधील रील पाहून लोकेशन मिळाले, पाठलाग करून हत्या:आधी कारने चिरडले; मृत्यूची खात्री करण्यासाठी यू-टर्न घेऊन दांड्याने मारले