![]()
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी उभी पिके करपल्याने ७० हजार ३९७ शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील ६४ हजार १५०.२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसा
.
तालुक्यातील १२८ गावांमधील ६१ हजार १५१ शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५७ हजार ३१६.४१ हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, मका, सोयाबीन आणि इतर तृणधान्य पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. या क्षेत्रासाठीच ४८ कोटी ७१ लाख ८९ हजार ४८० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाआहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तालुका कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचा संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत अद्याप ठोस हालचाल दिसत नाही. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या घरात अंधार दाटण्याची चिन्हे आहेत. शासनाने प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देऊन मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी होत आहे.
कांदा, टोमॅटो आणि भाजीपाल्याची माती दुष्काळाची झळ केवळ कोरडवाहू शेतीपुरती मर्यादित राहिलेली नसून नगदी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील ११९ गावांमधील ७ हजार ६३० शेतकऱ्यांचे ४ हजार ६२४.०५ हेक्टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, यासाठी हेक्टरी १७ हजार रुपयांप्रमाणे ७ कोटी ८६ लाख ०८ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
सिन्नर तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे. आगामी काळात शासन निर्णय घेईल, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा मोबदला मिळेल. – ज्ञानेश्वर नाठे , तालुका कृषी अधिकारी, सिन्नर
९७ गावांतील १ हजार ६१६ शेतकऱ्यांच्या २ हजार २०९.७० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब, पेरू, आवळा, चिकू आणि बोर यांसारख्या फळबागा बाधित झाल्या आहेत. या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे ४ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांची मदत आवश्यक आहे.