Headlines

गळतीकडे दुर्लक्ष; तलाव कोरडा पडल्यावर सर्व्हे:जलसंधारण विभाग अधिकाऱ्यांकडून तलावाची पाहणी




बागलाण तालुक्यातील एकलहरे (जायखेड) शिवारातील डुवाच्या पाझर तलावातील पाणीगळतीबाबत ‘दिव्य मराठी’ने दि. २१ रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जलसंधारण विभागाने गुरुवारी ( दि. २२) पाहणी व सर्व्हे केला. मात्र, तोपर्यंत तलावातील शिल्लक पाणीसाठाही संपून तलाव कोरडा पडला. सुमारे २०० टीसीएम {उर्वरित पान. ३ दि. २१ ऑक्टोबरला प्रसिद्ध वृत्त. अहवाल सादर: कनिष्ठ अभियंता राहुल गुंजाळ सर्व्हेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार. निधीची मागणी: गळती रोखण्यास खर्चाचा अंदाज तयार करून निधी मागितला जाणार. दुरुस्तीचे काम: प्रशासकीय मंजुरी व निधीनंतर दुरुस्ती केली जाणार. निधी मिळताच काम सुरू करणार ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेऊन तातडीने पाहणी व सर्व्हे केला आहे. गळती थांबवून तलावाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जात असून, निधी मंजूर होताच काम सुरू केले जाईल. – राहुल गुंजाळ, कनिष्ठ अभियंता, जलसंधारण विभाग, सटाणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *