Headlines

मनमाडमध्ये चुकीच्या वीज बिलांवरून शिवसेना आक्रमक:नवीन मीटरची सक्ती थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा




शहरात मीटर रीडिंग घेतल्यानंतरही ग्राहकांना चुकीची सरासरी वीजबिले दिली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, जुने मीटर व्यवस्थित असतानाही नवीन मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात असल्याने मनमाड शहर शिवसेना आक्रमक झाली आहे. याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात महावितरणचे शहर अभियंता सुनील कुमावत यांच्याशी पदाधिकाऱ्यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मीटर रीडिंगनंतरही संबंधित छायाचित्र ॲपवर अपलोड होत नसल्याने सरासरी बिले दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. चुकीची बिले दुरुस्त करावीत, बिलातील समायोजक युनिट योग्य सरासरीनुसार आकारावेत आणि दोष नसलेल्या जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यास तक्रारींसाठी भाग १ साठी ८९५६६३२६०६ तर भाग २ साठी ८९५६६३२६०५ हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला. या वेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *