![]()
शहरातील साक्षी चांडक हीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) इंटरमिजिएट परीक्षेत ५०२ गुण मिळवत देशात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने साक्षीचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या यशात मोलाची साथ देणाऱ्या आई-वडिलांचाही सन्मान करून संपूर्ण चांडक कुटुंबाचा गौरव करण्यात आला. साक्षीने मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून शहरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साक्षीच्या यशामागे पालकांचे संस्कार, मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्याग यांचे महत्त्व अधोरेखित करत कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने तिच्या आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आला. या सत्कारप्रसंगी कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आत्माराम मते उपस्थित होते. साक्षीने मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. योग्य ध्येय, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे तिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, मनसे विद्यार्थी सेनेचे आत्माराम मते, अभिजीत कुलकर्णी, रामदास चौधरी, नगरसेवक किरण फलटणकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
Source link
सीए परीक्षेत देशात संयुक्त प्रथम; साक्षी चांडकचा सत्कार:इगतपुरीत कळसूबाई मित्रमंडळातर्फे सन्मान