Headlines

संभाजीनगरात कर्जमाफीच्या चौथ्या यादीत 17 हजार 484 शेतकरी ठरले पात्र:आतापर्यंत 93 हजार खात्यांवर 699 कोटी रुपये वर्ग




दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी १७ हजार ४८४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे, एकाच शेतकऱ्याने दोन किंवा अधिक बँकांतून पीक कर्ज घेतले असल्यास त्याच्या पात्र कर्ज खात्यांवरील थकबाकी शासनाच्या धोरणानुसार माफ होणार आहे. जिल्ह्यातील एकूण लाभार्थींपैकी ९ हजार ४३४ म्हणजे तब्बल ५४ टक्के शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, तर उर्वरित ८ हजार ५० इतर बँकांशी संबंधित आहेत. यादी जाहीर होताच शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) ग्रामीण भागात प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये आपले नाव शोधण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांत ४७ हजार ५४७ लाभार्थींची नावे जाहीर झाली असून, त्यात सर्वाधिक शेतकरी संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. विभागाच्या एकूण संख्येत जिल्ह्याचा वाटा ३६.८ टक्के आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान वितरित, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीक कर्जे व पुनर्गठित कर्जांना माफी मिळेल. ३१ मार्च २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ होईल. Ãकर्जमाफीच्या चौथ्या यादीतील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत आपले नाव आणि ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी तपासावी. आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. वृद्ध, मृत तसेच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या लाभार्थींसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित केली आहे. – समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जिल्ह्यात १ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ९३ हजार कर्ज खाती निरंक होऊन ६९९ कोटी रुपयांची कर्जमाफी झाल्याची माहिती होती. त्यानंतर २२ ऑक्टोबरच्या चौथ्या यादीत आणखी १७ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश झाला. मात्र, या कालावधीत किती नवीन कर्ज खाती निरंक झाली, माफीच्या रकमेत किती कोटींची भर पडली, याची अद्ययावत आकडेवारी जाहीर झालेली नाही. एखाद्या शेतकऱ्याने जिल्हा बँकेसह दुसऱ्या बँकेतूनही पीक कर्ज घेतले असेल, तर अशा शेतकऱ्यांचा चौथ्या यादीत समावेश आहे. एकापेक्षा अधिक बँकांत कर्ज खाती असल्यामुळे माफीच्या लाभाबाबत असलेली अनिश्चितता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित खात्यांची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर माफीची रक्कम जमा केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *