![]()
महामंडळाच्या तिकीट दराच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सला दीडपट भाडे आकारण्याची मुभा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगाऊ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांची गर्दी वाढताच काही ट्रॅव्हल्सनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. पुण्याचे तिकीट ६०० रुपयांवरून १,८९०, तर मुंबईचे तिकीट ८०० रुपयांवरून ३ हजारांपर्यंत आकारले जात होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
Source link
एसटीच्या दीडपट भाड्याची परवानगी:जास्त घेतल्यावर ट्रॅव्हल्सवर कारवाई