Headlines

Chandrakant Khaire Slams BJP-Shinde Over Manoj Jarange Audio Clip Controversy


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. “पाचशे

.

‘जरांगेंना खाली खेचण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा डाव’

मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना खैरे म्हणाले, “जरांगे पाटील मराठवाड्यातील आहेत. मराठा समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे समाज त्यांच्यासोबत जोडला गेला. कुणी मोठा होत असेल, तर राजकीय नेत्यांना वाटते आपले काय होणार? त्यामुळे जरांगेंना खाली खेचण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मिळून केला, पण आता ते त्यांच्याच अंगाशी आले आहे. ज्यांनी जरांगेंना मोठे केले, तेच आता त्यांना मागे खेचत आहेत.”

‘मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचे नाटक’

राज्यातील दुष्काळ आणि महागाईकडे लक्ष वेधत खैरे म्हणाले, “शेतकरी अत्यंत हलाखीत आहे, रोज आत्महत्या होत आहेत. कुठेही पाणी नाही, शेती ओसाड पडली आहे, सणासुदीच्या काळात महागाई वाढली आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे (ऑडिओ क्लिप प्रकरण) नाटक जाणीवपूर्वक रचले आहे. या सगळ्याच्या पाठीमागे भाजप आणि शिंदे गट असून त्यांना अमित शहा यांचा आशीर्वाद आहे.”

५०० कोटींची चौकशी व्हावीच

राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या सवालांना खैरे यांनी पाठिंबा दिला. “५०० कोटींचा खुलासा आणि चौकशी झालीच पाहिजे. श्रीकांत शिंदे यांनी पैसे पोहोचवले असतील, तर त्यांना बोलावून जाब विचारा. शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देताना हात आखडता घेता आणि इथे ५०० कोटींचे व्यवहार चालतात! जरांगे हे नॉन-करप्ट माणूस आहेत, त्यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे,” असा आरोप त्यांनी केला.

‘यांच्या काळात गुंडगिरी पोसली गेली’

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत खैरे म्हणाले, “महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर कुणीही हँडल करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. रोज खून होत आहेत. जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई सगळीकडे हेच सुरू आहे. आमच्या काळात किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शांत होता, कुठेही दंगली झाल्या नाहीत. पण आता यांच्या काळात गुंडगिरी जास्त पोसली गेली आहे.”

‘निकालानंतर मारामारी होईल’

विधान परिषदेच्या मतदानाबाबत बोलताना ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजपमध्ये दरी वाढली आहे. आजच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल २७ तारखेला आल्यानंतर त्यांच्यात कशा मारामारी होतात, ते पहा. ही फाटाफूट आमच्यासाठी चांगलीच आहे.

———————

हेही वाचा..

500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिवसेना युतीत भडका: मनोज जरांगेंनी जारी केलेल्या क्लिपचे तीव्र राजकीय पडसाद, युतीतील वार-पलटवार

विधानसभा २०२४ मध्ये आपल्या नावावर डॉ. श्रीकांत शिंदेंनी ५०० कोटी रुपये भाजपकडून आणले, असा आरोप करत मनोज जरांगेंनी गुरुवारी एक ऑडिओ क्लिप जारी करून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. हीच मागणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडूनही झाली. ती मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीसह चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अडीच वर्षांनंतर ही क्लिप का बाहेर आली, असा खोचक सवालही केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.