मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजवला आहे. या वादावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत
.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही या प्रकरणात उडी घेत, “जरांगेंना मोठे कुणी केले आणि आता त्यांना बाजूला का केले जात आहे?” असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एकाच दगडात दोन पक्षी; जरांगे अन् एकनाथ शिंदेंना संपवण्याचा कट
ऑडिओ क्लिपमधील संभाषणावर राजकीय विश्लेषण करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “कथित 500 कोटींच्या या ऑडिओ क्लिपचा बारकाईने अभ्यास केला, तर यामागे फार मोठी राजकीय खेळी दिसते. एका बाजूला मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा डागाळून त्यांना समाजातून बाजूला करायचे आणि दुसऱ्या बाजूला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव यात ओढून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पंख छाटायचे, असा हा ‘एका दगडात दोन पक्षी’ मारण्याचा प्रयत्न आहे. हे कुटील षड्यंत्र नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालले आहे, हे निष्पक्ष तपासातूनच समोर येऊ शकते.”
“सरकारने या प्रकरणावर केवळ वेळकाढूपणा करू नये. या क्लिपचे स्वतंत्र फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषण करून सत्य जनतेसमोर मांडणे ही काळाची गरज आहे.”
सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली
राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या रंगलेल्या चर्चांवर बोलताना चव्हाण म्हणाले, “भाजपकडून अशा ऑफर्स दिल्या जाणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. सुशीलकुमार शिंदे यांनाही भाजपने निश्चितपणे गळाला लावण्याचा प्रयत्न केला असावा; मात्र निष्ठावंत काँग्रेसजन असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी ती ऑफर साफ फेटाळून लावली आहे.”
कोल्हापुरात सतेज पाटलांची बाजी
“कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निकालावरून त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे जाहीर अभिनंदन केले. ‘२५-०’ असा एकतर्फी निकाल लागेल आणि आपण कोल्हापुरात जाऊन गुलाल उधळू, या अतिआत्मविश्वासात मुख्यमंत्री होते. मात्र, कोल्हापूरच्या सुजाण जनतेने सत्ताधाऱ्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. गोकुळचा हा निकाल आगामी काळात राज्यात आणि देशात सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे दाखवून देतो,” असा दावाही त्यांनी केला.
———————————————————
हेही वाचा…
SITची नाटकं बंद करा, आधी 500 कोटींचा FIR दाखल करा: ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या प्रकरणाची एसआयटी किंवा फॉरेन्सिक चौकशी करण्याऐवजी आधी एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी