मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असताना, आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर
.
‘वाशीच्या वॉर रूममध्ये क्लिप, सामनाच्या कार्यालयात स्क्रिप्ट’
ऑडिओ क्लिपच्या निर्मितीवर गंभीर आरोप करताना बन म्हणाले, “संजय राऊत यांनी त्यांच्या टीमला कामाला लावून गेल्या दोन महिन्यांपासून ही ऑडिओ क्लिप तयार केली. वाशी येथील वॉर रूममध्ये ‘एआय’चा वापर करून आणि युट्युबवरील नेत्यांचे ऑडिओ सॅम्पल्स घेऊन ही क्लिप बनवली गेली. या पूर्ण ऑडिओ क्लिपची स्क्रिप्ट सामनाच्या कार्यालयात बसून स्वतः संजय राऊत यांनी लिहिली आहे. कोणाच्या तोंडी कोणते डायलॉग टाकायचे, हे राऊतांनीच ठरवले.”
‘१०० कोटींऐवजी ५०० कोटींचा आकडा टाकला’
५०० कोटींच्या आकड्याबाबत बोलताना त्यांनी एक धक्कादायक दावा केला. “संजय राऊतांची सुरुवातीला १०० कोटींचा आरोप टाकण्याची इच्छा होती. पण १०० कोटींचा मुद्दा मीडियात फारसा चालणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी क्लिपची ‘ग्रॅव्हिटी’ वाढवण्यासाठी ऐनवेळी ५०० कोटींचा ऑडिओ जोडला,” असा दावा बन यांनी केला. ही क्लिप राऊतांनी संभाजीनगरच्या एका व्यक्तीमार्फत मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

‘वेब सिरीज काढली तर ऑस्कर मिळेल’
संजय राऊत यांच्यावर टीका करताना बन म्हणाले, “स्क्रिप्ट रायटिंगमध्ये संजय राऊतांचा कोणीही हात धरू शकत नाही. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी वेब सिरीज काढली तर त्याला नक्कीच ऑस्कर मिळेल. मनोज जरांगे पाटील, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वितुष्ट यावे आणि त्यांची बदनामी व्हावी, यासाठी राऊतांनी हे कुंभांड रचले आहे.”
‘राहुल गांधींकडून फंडींग मिळतेय का?’
या षड्यंत्रामागे आर्थिक देवाणघेवाण असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. “भाजपची बदनामी करण्याची सुपारी संजय राऊतांनी राहुल गांधींकडून घेतली आहे. या क्लिपचा फायदा फक्त उबाठा गट आणि काँग्रेसलाच होणार आहे. त्यामुळे राऊतांनी राहुल गांधींकडून काही फंडींग घेतले आहे का? याचीही एसआयटी मार्फत चौकशी व्हावी,” अशी मागणी बन यांनी केली.
‘पाकिस्तानच्या न्यायमूर्तींकडून चौकशी करा’
संजय राऊत यांचा एसआयटी, पोलीस किंवा देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचा टोला लगावत बन म्हणाले, “त्यांची इच्छा असेल तर त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहावे आणि पाकिस्तानच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमून चौकशी करावी. त्यातही संजय राऊतांचेच नाव पुढे येईल.”
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एनडीआरएफच्या (NDRF) नियमानुसार सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाईल.
————————
हेही वाचा..
SITची नाटकं बंद करा, आधी 500 कोटींचा FIR दाखल करा:ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, या प्रकरणाची एसआयटी किंवा फॉरेन्सिक चौकशी करण्याऐवजी आधी एफआयआर दाखल करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा