![]()
अन्नपूर्णा आणि शक्तीचे रूप असलेल्या माँ दुर्गा उत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात पार पडली. बुधवारी सोयगाव आणि फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ६५ दुर्गा उत्सव मंडळांनी श्री दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन केले. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वा
.
गणेशोत्सवाच्या काळापासूनच सोयगाव व फर्दापूर परिसरात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली होती. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, डॉल्बी, लेझर दिवे तसेच तीव्र आवाज करणाऱ्या साधनांचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आवाहनाला सर्व दुर्गा उत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लेझर आणि डॉल्बी संस्कृतीला बाजूला सारून पारंपरिक वाद्ये, टाळ-मृदंग आणि ढोल-ताशांच्या तालावर मिरवणुका काढल्यामुळे उत्सवाला पारंपरिक आणि पवित्र स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत भक्तांनी मातेचा गौरव केला. विसर्जनाच्या अंतिम क्षणी अनेक भाविक भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः नारळीबाग येथील शक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीत विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वात पथकाने चोख नियोजन केले.
पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात या बंदोबस्तात पोलिस उपनिरीक्षक गजानन आरेकर, ज्ञानेश्वर दांडगे, गजानन दांडगे, राजू सोनवणे, अजय कोळी, संदीप सुसर, सादिक तडवी, कुणाल जाधव, समाधान बारी यांच्यासह पोलिस कर्मचारी, २० एसआरपी जवान आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच फर्दापूर ठाण्याच्या हद्दीतही मिरवणुका शांततेत पार पडल्या.