Headlines

करंजखेड येथे विहिरीत बुडून शेतमजुराचा मृत्यू:विद्युत मोटार काढताना पाय घसरून दुर्घटना‎




कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे शेतातील विहिरीतून विद्युत मोटार काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ३५ वर्षीय शेतमजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुनील किसन चौतमल (३५, रा. करंजखेड, ता. कन्नड) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील चौतमल हे बाबासाहेब हाडोळे यांच्या शेतातील विहिरीतून विद्युत मोटार पंप काढण्यासाठी गेले होते. यावेळी शेतमालक बाबासाहेब हाडोळे व अन्य एक व्यक्ती उपस्थित होते. विहिरीतून मोटार बाहेर काढण्यासाठी दोर सोडत असताना सुनील यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले, अशी माहिती मयताचे भाऊ राहुल चौतमल यांनी दिली. घटनेनंतर नागरिकांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून करंजखेड येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुनील भिवसने तपास करीत आहेत. विहिरीत दोर सोडताना अचानक पाय घसरला सुनील चौतमल हे बाबासाहेब हाडोळे यांच्या शेतातील विहिरीतून विद्युत मोटार पंप काढण्यासाठी गेले होते. मात्र, विहिरीतून मोटार बाहेर काढण्यासाठी दोर सोडत असताना सुनील यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले, त्यांना सोबतच्या व्यक्तींनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *