![]()
गोल्फ हा केवळ प्रतिष्ठेचा नव्हे, तर कौशल्य, एकाग्रता आणि अचूकतेचा खेळ आहे. हा खेळ देशातील सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर यांनी केले. पुण्यातील प्रसिद्ध ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट अँड क्लब येथे आयोजित राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशभरातील गोल्फपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेमुळे गोल्फ खेळाच्या प्रसाराला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय पर्वाला गोल्फप्रेमी आणि खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत १६ संघांतील सुमारे १८० ते २५० खेळाडू सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. विविध संघांतील अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेतील प्रत्येक सामना चुरशीचा आणि रोमांचक ठरण्याची अपेक्षा आहे. या लीगमध्ये ईगल फोर्सेस,सुलतान ऑफ स्विंग्स, झिंगर्स, ग्रीन ग्लॅडिएटर्स, रोरिंग टायगर्स , सुब्बन सनरायझर्स, द लीगशी क्लब आणि बर्डी स्क्वॉड ,झिंगर,गोल्डन ईग्ल्स,बिनधास्त बॉयज,,जॅग्वार्स ,वॅस्कॉन पूना लायन्स यांसारख्या संघांचा सहभाग आहे. गोल्फच्या लोकप्रियतेला मिळणार नवी दिशा गोल्फ खेळाला अधिक व्यापक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. देशाच्या विविध भागांतील खेळाडूंना एकत्र आणत त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्याचे काम ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. या स्पर्धेमुळे पुण्यातील गोल्फप्रेमींना दर्जेदार खेळाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. उद्घाटनप्रसंगी ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे रोहन सेवलेकर, एस गोल्फिंगचे आदित्य मालपणी, रिसॉर्टचे व्यवस्थापक कौशिल वोरा आणि विविध संघांचे खेळाडू उपस्थित होते. यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची आणि रंगतदार होणार असून, पुणेकरांनी या क्रीडा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक रोहन सेवलेकर यांनी केले.
Source link
पुण्यात राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचा दिमाखदार शुभारंभ:देशभरातील नामांकित संघांमध्ये रंगणार चुरशीच्या लढती; सेवलेकर म्हणाले, गोल्फ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा.