Headlines

'रेकॉर्डिंगवरून मी खूप शहाणा झालो, आता समाजानेही व्हावे':आंदोलन उशिरा करू, पण मराठा सेवकांची भक्कम फळी उभारणारच- मनोज जरांगे पाटील




मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यातील प्रत्येक विभागात कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करावी लागणार असून, या सेवकांना एक व्हॉट्सॲप नंबर दिला जाणार आहे. सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, आता कोण फुटला आहे आणि कुठे गेला आहे, हे काही कळत नाही. रेकॉर्डिंगमधून मी खूप शहाणा झालो आहे, मराठा समाजाने देखील शहाणे व्हावे. तसेच, आंदोलन चार दिवस उशिरा करू, परंतु मराठा सेवकांची फळी तयार करणार, असा निर्धारही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला. मनोज जरांगे म्हणाले, आम्ही इमानदारीने काम करायचं आणि आमच्या सोबत तुम्ही जीव घेणे डाव टाकायचे. आम्ही आरक्षण मागितलं तुम्ही प्रचंड स्वरूपाच्या अडचणी उभा केल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच पडद्यामागचं बाहेर काढलं आहे की हे कशी प्लॅनिंग करु शकतात. आपल्याला राज्यभरात मजबूत फळी उभा करावी लागणार आहे. महायुतीचे नेते सध्या आमने-सामने आले असून, तो त्यांच्या राजकारणाचा भाग असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, आम्ही काय तुमचं वाईट केलं होतं म्हणून तुम्ही आमच्या विरोधात एवढं षडयंत्र रचलं आहे? आजसुद्धा तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात, आमच्या समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही का षडयंत्र उभे केले आहे? पडद्यामागे नेमके काय सुरू होते हे आपण राज्याला दाखवून दिल्याचे सांगत, या दुनियेत सरळ माणसाचं जगणं खूप अवघड झालं असून, गरिबांच्या पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही काम करत आहात, असा घणाघातही जरांगे पाटील यांनी केला. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आज कोण कुठे फुटला आहे आणि कोण कोणासोबत आहे, हे काहीच कळायला तयार नाही; त्यामुळे आता मराठा समाजाने आपल्या जवळचे कोण आहे, हे ओळखले पाहिजे. या पार्श्वभूमीवर, आता मराठा समाजाची आणि ‘मराठा सेवकांची’ एक नवीन व भक्कम फळी बांधावी लागणार असून, त्यानंतरच पुन्हा आंदोलनात उतरावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, हे फळी बांधण्याचे काम आपण येत्या दोन-तीन दिवसांतच सुरू करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा समाजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी आपण ‘मराठा सेवकांची’ एक मोठी फळी तयार करणार आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. रामदास कदम यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, रामदास कदम विनाकारण का बोलतात, हे शिंदे साहेबांसाठी महत्त्वाचे असून, रामदास कदम यांना बाथरुममध्ये काय खातो हे कोण सांगते, त्यांना गावातून कोणी काढून दिले, हे सर्व सत्य आता पुढे आले पाहिजे. प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, लाड यांना जी भूमिका घ्यायची आहे ती त्यांनी नक्की घ्यावी, मात्र आज ती वेळ नाही. पडद्यामागे शिजणारे कट मोडीत काढण्यासाठी आता आपल्याला सज्ज होऊन काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे जरांगे पाटील यांनी शेवटी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *