Headlines

हिंगोलीत शेतातील विहिरीच्या पाण्यावरून वाद:पुतण्याने काका-काकूचा चाकूने भोसकून केला खून, औंढा नागनाथ तालुक्यातील वडद गावातील घटना




औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे शेतातील सामाईक विहीरीचे पाणी तसेच शेतीच्या वादातून पुतण्यानेच काका अन काकूवर चाकूने वार करून संपविल्याची घटना रविवारी ता.25 सकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्या्तील वडद येथे त्र्यंबक चोपडे (55) व त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे यांच्यात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु आहे. त्यांच्या शेतात दोघांची सामाईक विहीर असून या विहीरीचे पाणी पिकांना देण्यावरूनही त्यांच्याच नेहमीच वाद होत होते. किरकोळ कुरबुरी नंतर काही मध्यस्थांच्या मदतीने वाद मिटत होते. दरम्यान, त्र्यंबक चोपडे हे शेतात कामासाठी गेले असतांना त्यांचा पुतण्या देवेंद्र याने शेतात जाऊन काका त्र्यंबक यांच्यासोबत वाद केला त्यानंतर चाकूने त्यांना भोसकले. अचानक झालेल्या हल्यामुळे त्र्यंबक प्रतिकार करू शकले नाही अन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर देवेंद्र हा गावात आला. गावात येऊन त्याने थेट काका त्र्यंबक यांचे घर गाठले. त्यांचा मुलगा बाहेरगावी गेल्यामुळे त्र्यंबक यांच्या पत्नी मंगलाबाई चोपडे एकट्याच घरी होत्या. यावेळी सुडाने पेटलेल्या देवेंद्र याने त्यांच्या घरात प्रवेश करून मागचा पुढचा विचार न करता काकू मंगलाबाई यांनाही चाकूने भोसकले या हल्यात त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर देवेंद्र बाजूला थांबून होता.या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अय्यूब शेख, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, श्रीधर वाघमारे, जमादार रवीकांत हरकाळ, ओंकारेश्‍वर रांजणीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देवेंद्र यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मयत त्र्यंबक व त्यांची पत्नी मंगलाबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे औंढा नागनात तालु्यात एकच खळबळ उडाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *