11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये विविध राज्ये आणि शहरांमध्ये एकूण 16 दिवस बँका बंद राहतील. 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारव्यतिरिक्त 9 दिवस विविध ठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील.
अशा परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, या सुट्ट्यांचे दिवस वगळून तुम्ही बँकेत जाऊ शकता.
कोणत्या शनिवारी बँका बंद राहतील?
- 14 नोव्हेंबरला महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- 28 नोव्हेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आहे. या दिवशीही देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल.
रविवारची सुट्टी कधी-कधी असेल?
- 1 नोव्हेंबर
- 8 नोव्हेंबर
- 15, 22 आणि 29 नोव्हेंबर

ऑनलाइन बँकिंगद्वारे कामे उरकता येतील
बँकांना सुट्टी असली तरी तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार किंवा इतर कामे करू शकता. या सुविधांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.