![]()
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना महावितरणकडून वीज चोरीच्या दंडापोटी १० ते १५ हजार रुपयांची वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वीज दंडात सवलत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद राऊत यांच्याकडे केली. मंगळवारी (ता. २७) रोजी सिल्लोड येथील महावितरण कार्यालयात काकडे यांनी मुख्य अभियंता राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या वीजबिलांसह वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी भराडी सर्कलसह सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असताना वीज चोरीच्या दंडात्मक कारवाईमुळे त्यांच्यासमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकऱ्यांना दंड भरणे कठीण होत असल्याने वीज दंड कमी करावा किंवा त्यातून सवलत द्यावी, अशी विनंती काकडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महावितरणने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि वीज बिल व दंडासंदर्भात योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Source link
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वीज दंडात सवलत द्या- राधाकृष्ण काकडे