Headlines

सह्याद्रीत गाऊन घालून विद्यार्थ्यांनी घेतली डिग्री:सह्याद्री फार्मसीमध्ये दीक्षांत समारंभ उत्साहात




सांगोला जीवनातील एक शैक्षणिक टप्पा यशस्वी पूर्ण केल्याचा आनंद नव पदवीधरांनी जल्लोष करून साजरा केला. सेल्फीच्या, फोटो माध्यमातून हे आनंदी क्षण त्यांनी साठवून ठेवले. कॉलेजच्या मदतीने विद्यार्थ्यांनी एकसारखी दीक्षांत गाऊनची वेशभूषा केली होती. त्यांच्या कपड्यांच्या रंगसंगतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांवर भर सभामंडपात त्यांचे शिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. हुबेहूब विद्यापीठसारखा दीक्षांत समारंभ कॉलेजने आयोजल्याबद्दल सर्व पालक व विद्यार्थ्यांनी संस्था वरिष्ठांचे व आयोजकांचे आभार मानले. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे कॉलेजमध्ये ऐतिहासिक असा दीक्षांत समारंभ व माजी विद्यार्थी मेळावाचे आयोजन केले होते. संस्था विश्वस्त विश्वजीत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. बी. फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ब्याचच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे सूर्योदय समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिल इंगवले व पोलिस उपअधीक्षक सीताराम डुब्बल, संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, सचिव सुवर्णा इंगवले, संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांना देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांचे आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या समारंभानंतर माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपले सह्याद्रीमधील आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी उपस्थित आजी विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन केले. सह्याद्रीसारखे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, गुणवान व अनुभवी शिक्षक, निसर्गरम्य वातावरण, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण व ऋणानुबंध इतर कोठेही दिसत नाही, अशी प्रशंसा माजी विद्यार्थ्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *