![]()
महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला आहे. 25 एप्रिल रोजी राज्यातील 15 शहरांचे तापमान 41 अंश सेल्सियसवर गेले. अकोला, अमरावतीत 45.3, तर वर्ध्यात 45.5 अंश तापमान होते. देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती, वर्धा आहेत. छत्रपती संभाजीनगरात या मोसमातील सर्वाधिक 41.8 अंश तापमानाची नोंद झाली. 5 दिवसांनी मराठवाड्यासह, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 2025च्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये राज्याचे सरासरी तापमान 1.1 अंश जास्त आहे. 2025मध्ये राज्याचे सरासरी तापमान 24.8 होते. ते या वेळी 25.9 अंश आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तुपडी येथे सिया नेताजी गोरे या 9 महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. अकोला येथील शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्षात शनिवारी दोन उष्माघातसदृश रुग्ण दाखल झाले आहेत. देशात सर्वाधिक 47.4 तापमान बांदा येथे नोंदवले गेले. भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रविवार, सोमवारीही उष्णतेची लाट कायम राहिल. त्यानंतर दोन दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो.
नाशिकला यंदाच्या मोसमातील उच्चांकी 41.5 तापमानाची नोंद नाशिकरोड | शनिवारी नाशिकने 41.5 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. तापमान 40 अंशांवर जाताच 1 तासात 60 मिली क्षारयुक्त पाणी शरीराबाहेर पडते तापमान 40 अंशांवर गेले की, उन्हात एक तास राहिल्यास 50 ते 60 मिली क्षारयुक्त पाणी शरीरातून बाहेर जाते. त्यासोबत सोडियम व पोटॅशियम निघून जाते, यामुळे अशक्तपणा येतो. चक्कर येणे, डोके दुखणे, अशक्तपणा, हातपाय दुखणे, पायांवर सूज येणे आदी परिणाम होतात. यापासून बचावासाठी दररोज 4 लिटर पाणी प्यावे. सोडियम व पोटॅशियमची पातळी टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस, लिंबू पाणी, नारळी पाणी, ताक, लस्सी घ्यावी. कर्करोग, दुर्धर आजार असलेल्यांनी लग्नासारखे सोशल गॅदरिंग टाळावे. लहान मुले, महिला व वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी. पर्यटन टाळावे. लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी लातूर | कमी उंचीच्या पत्र्याच्या घरात दिवसभर पाळण्यात झोपलेल्या सिया नेताजी गोरेचा (9 महिने, मूळ रा. तुपडी, ता. निलंगा) शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात हा उष्माघाताचा दुसरा बळी आहे. गेल्या दहा दिवसात लातूर जिल्ह्यात किमान 39 ते कमाल 42 अंश तापमान आहे. औसा तालुका आरोग्य अधिकारी देवणीकर म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार उष्माघाताचा संशय आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल. 4-5 दिवस उष्णतेचे आगामी 4-5 दिवस उन्हाची तीव्रता कायम राहील. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. – माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ, पुणे हवामान केंद्र डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, जिल्हा रुग्णालय, अकोला कशामुळे एवढी वाढ महाराष्ट्र आणि कर्नाटकदरम्यान हवेच्या साधारण 3.1 ते 5.8 किमी उंच स्तरात ‘अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन’ तयार झाले. यामुळे हवा वर जाण्याऐवजी खाली दाबली जाते, ज्यामुळे ढग तयार होत नाहीत. सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचून तापमान वाढत आहे.
Source link