![]()
लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचे प्रणेते, समता आणि मानवतेचा संदेश देणारे महान शासक सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरात राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात अनेक पुरोगामी संस
.
सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा शैलेश इंगळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक दिवसीय महोत्सवाची रूपरेषा मांडण्यात आली. बुधवार २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक आबासाहेब खेडकर सभागृह, रामदास पेठ येथे हा भव्य महोत्सव प्रारंभ होणार आहे. यावर्षी महोत्सवाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे भूषवणार आहेत. उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील खा. बळवंत वानखडे, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, आ. धीरज लिंगाडे, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, आ. सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. महेश गणगणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, सिनेट सदस्य डॉ. संतोष बनसोड, भवनसुंदर वानखडे, डॉ. जगदीश बक्तुरे, कर अधिकारी विनोद विरघट, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, सिनेट सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे, ओबीसी सत्यशोधक परिषदेचे मोहन बेलसरे, मराठा सेवा संघाचे प्रदीप चोरे, पंकज जायले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. नमन आंबेकर, जिजाऊ रेणू गावंडे आदी ंची उपस्थिती राहणार आर्हे.
माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न राहणार आहे.सम्राट अशोक यांनी भारतात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्रांती घडवून भगवान बुद्धांचे समतेचे विचार जगभर प्रसारित केले.त्यांच्या लोक कल्याणकारी धोरणांचा प्रभाव भारतीय संविधानावर दिसून येतो. तरीदेखील समाज व्यवस्थेत त्यांचे योगदान अपेक्षेप्रमाणे अधोरेखित होत नसल्याची खंत व्यक्त केली.