Headlines

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, ही दगडावरची रेघ!:संकरित राजकारण करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा शिंदे सेनेवर प्रहार




“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी काळात पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. संकरित राजकारण करणाऱ्यांचा काळ आता संपला असून, ‘युज अँड थ्रो’ पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही,” असा दावा ज्येष्ठ वकील आणि राजकीय विश्लेषक ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी “पुढील 3 ते 4 महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील” असे विधान केले होते; त्या विधानाचा समाचार घेत सदावर्ते यांनी शिंदे सेनेच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याकांड, मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावरील टीका, कर्जत-भीमाशंकर प्रकल्प, आणि ग्रंथालीच्या मंचावर एकत्र आलेले फडणवीस व ठाकरे बंधू या राजकीय घडामोडींवर मते मांडली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, ही दगडावरची रेघ मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्याचा प्रतिवाद करताना सदावर्ते म्हणाले, शिरसाट यांचे ते विधान केवळ एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यक्तिगत प्रेमापोटी आलेले आहे. अशा विधानांमध्ये कोणतेही राजकीय तथ्य किंवा वास्तव नाही. संकरित आणि संधिसाधू राजकारण करणारे कधीही पुन्हा त्या पदावर पोहोचू शकत नाहीत.” ‘युज अँड थ्रो’ संस्कृती चालणार नाही “महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि संविधानाला धरून चालणारे राजकारण हवे आहे. लोकांचा वापर करून सोडून देण्याची कार्यपद्धती जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शिरसाट, उदय सामंत आणि धंगेकर यांनी हे स्पष्ट ऐकून घ्यावे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.” ठाण्यातील ‘दाढीवाला अजगर’ आणि संशयित डीसीपींचा पर्दाफाश करणार ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येबाबत बोलताना सदावर्ते यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बाळू पूर्णेकर यांच्या हत्येला आता 28 दिवस उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील मूळ सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. पकडलेले आरोपी हे केवळ 25-25 हजारांचे भाडोत्री गुंड असल्याची चर्चा असून, त्यांच्या पाठीमागे नेमका कोणता राजकीय ‘गॉडफादर’ आहे, हे समोर आले पाहिजे.” वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर संशय “मागील काही दिवसांतील घडामोडींवरून ठाण्यातील एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद वाटते. बिल्डर लॉबी आणि राजकीय फायद्यासाठी ही हत्या झाली आहे. यामागे असलेला ‘दाढीवाला अजगर’ कोण आहे, हे वेळ आल्यावर पुराव्यानिशी समोर आणले जाईल.” मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर भाष्य “गंभीर आरोपांनंतर स्वतःहून राजीनामा देणे म्हणजे कायदेशीर भाषेत ‘अलिबी’ तयार करण्याचा प्रकार आहे. पूर्णेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना तिथे निषेध रॅली काढणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे चुकीचे आहे.” नवनाथ बन यांची लायकी काढणाऱ्यांनी स्वतःची पातळी तपासावी भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांना धमकावणाऱ्या नेत्यांवर सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला.”नवनाथ बन हे एका छोट्या ओबीसी समूहातून पुढे आलेले युवा प्रवक्ते आहेत. ते पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. अशा वेळी ‘रडायला वेळ देणार नाही’ अशी भाषा वापरून त्यांची लायकी काढणे ही जातीय अहंगंडातून आलेली मानसिकता आहे.” घटनेने दिलेला अधिकार “भारताचे संविधान आणि कलम 14 सर्वांना समानतेचा अधिकार देते. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे असू शकत नाही. नवनाथ बन यांच्या पाठीशी संपूर्ण वंचित व मागासवर्गीय समाज उभा राहील.” फडणवीस-ठाकरे बंधूंचे एका मंचावर येणे म्हणजे ‘ऑर्गॅनिक पॉलिटिक्स’ ग्रंथाली प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आल्याच्या घटनेचे त्यांनी स्वागत केले. “काल ग्रंथालीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसले. हे दृश्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे आणि सुसंस्कृत परंपरेचे दर्शन घडवणारे होते. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.” संवादाची नवी सुरुवात व्हावी “महाराष्ट्राच्या हितासाठी अशा प्रकारचा सुसंवाद कायम राहिला पाहिजे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद असता कामा नयेत. या तिन्ही नेत्यांनी काल दाखवलेली प्रगल्भता राज्यातील सध्याच्या संकरित राजकारणाला चपराक देणारी आहे.” कर्जत प्रकल्प आणि सयाजी शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्न “कर्जत-भीमाशंकर येथील वीज प्रकल्पावरून सुरू असलेल्या पर्यावरण आंदोलनावर बोलताना त्यांनी, ‘लवासा प्रकल्पात तब्बल 25,000 एकर जमिनीचे काय झाले?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. प्रकल्पांना विरोध करताना वस्तुस्थितीचा आणि आकडेवारीचा अभ्यास केला पाहिजे. 233 हेक्टर जमीन आणि 25,000 एकर जमीन यातील फरक समजून न घेता बोलणे अयोग्य आहे. आदिवासी बांधवांचे पुनर्वसन आणि पर्यावरणाचा समतोल या दोन्ही घटकांचा विचार करूनच निर्णय झाला पाहिजे,” असे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. ———————————————————————- हेही वाचा… नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात: राष्ट्रपती मुर्मू ध्वजस्तंभ पूजन, ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणार; 22 महिने चालणार नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. दुपारी 12:02 वाजता रामकुंड येथे ध्वजारोहण होईल, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन धार्मिक शहरांमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ भरतो. लाखो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात. नाशिकमध्ये रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर स्नान केले जाते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *