Headlines

अमरावतीत बिबट्याची दहशत:कुत्र्याची शिकार सीसीटीव्हीत कैद, पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी




अमरावतीतील विद्यापीठ आणि तपोवन भागातील माधवी विहार व संकेत कॉलनीत गेल्या १० ते १५ दिवसांपासून बिबट्या दिसत आहे. त्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी उपवनसंरक्षकांकडे मागणी केली आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, बिबट्या सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास या भागात दिसतो. त्यामुळे रहिवाशांना मुलांना खेळायला पाठवणे आणि वृद्ध तसेच महिलांना घराबाहेर पडणे धोक्याचे वाटत आहे. या वेळेत लहान मुले कॉलनीत खेळतात, तर वृद्ध आणि इतर नागरिक फिरायला बाहेर पडतात. कॉलनीतून जाणारा नाला झाडाझुडपांनी वेढलेला आणि अस्वच्छ आहे. तिथे अंधार असतो. रस्त्यांवर पुरेसे आणि जास्त प्रकाश देणारे दिवे नसल्याने तिथेही अंधार असतो. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील महिला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) तपोवन शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक धंदर यांच्याकडे केली. या शिष्टमंडळात किसान सभेचे सरचिटणीस कॉ. अशोक सोनारकर, भाकपच्या तपोवन शाखेचे सचिव कॉ. सुशील ढोले, विद्यापीठ शाखेच्या लता सोनारकर, महिला फेडरेशनच्या रुपाली गवई, नीता रताळे, शिल्पा खिल्लारे, सोनाली भोयर, तृप्ती नांदुरकर, अर्चना डोंगरे, माधुरी हजारे, अपर्णा सरे आणि उज्वला हंबर्डे उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *