Headlines

सेल्युलर जेलच्या भेटीदरम्यान संदीप जाधव यांचे निधन:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीचे सदस्य होते




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रवर्तक संदीप शिवाजी जाधव (वय ५३) यांचे बुधवारी (दि. ४) पहाटे अंदमान येथे निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक संघर्षस्थळाच्या (सेल्युलर जेल) भेटीदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारी (दि. ५) सकाळी ९:३० वाजता नेहरूनगर स्मशानभूमी येथे होईल. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगरचे रहिवासी असलेले संदीप जाधव हे व्यावसायिक क्षेत्रातही उच्च पदावर कार्यरत होते. कल्याण जनता सहकारी बँकेत त्यांनी पुणे विभागीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले जाधव यांनी शाखा स्तरापासून ते प्रांतापर्यंत अनेक महत्त्वाची दायित्वे यशस्वीपणे पार पाडली. संघातील एक उत्तम घोषवादक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे ‘मुख्य मार्ग प्रमुख संयोजक’ हे महत्त्वाचे दायित्व होते. ‘निर्मल वारी’चे प्रवर्तक श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढी वारीला स्वच्छतेचे अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राबवल्या गेलेल्या ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रवर्तक म्हणून त्यांनी ऐतिहासिक योगदान दिले. वारीतील हगणदारीमुक्तीसाठी निर्मल वारीच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या उभारणीत संदीप जाधव यांचा मोलाचा वाटा होता. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ढोल-ताशा महासंघा’च्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक अभ्यासू, संयमी आणि समर्पित नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *