Headlines

4.87 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा:अहिल्यादेवी होळकर योजनेत 4,765 कोटी रुपये; पुणे जिल्ह्यातील 12,886 शेतकऱ्यांना 78.94 कोटींचा लाभ




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील १२,८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १८,०४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १३,२७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या काळात दिलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जाला या योजनेचा लाभ मिळतो. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जासाठीही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाते. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीद्वारे होत आहे. यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर बँकांनी ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीच्या संगणकीय तपासणीनंतर आधार प्रमाणीकरणासाठी चार याद्यांमध्ये २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.पात्र शेतकरी आणि त्यांना मिळणाऱ्या रकमेची विभाग व जिल्हानिहाय यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *