Headlines

आंतरजातीय विवाहाचे पौरोहित्य केल्याच्या रागातून निर्घृण खून:इचलकरंजीतील प्रसिद्ध पुरोहित मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा, आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या




इचलकरंजी येथील प्रसिद्ध ज्योतिषी आणि पुरोहित मंदार अजित रानडे (वय 35) यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात कर्नाटकातील सदलगा पोलिसांना यश आले आहे. मुलीने केलेल्या आंतरजातीय प्रेमविवाहाला मदत केल्याच्या आणि त्या लग्नाचे पौरोहित्य केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी दीपक उर्फ बाबूसाहेब अण्णा मगदूम (वय 45, रा. शिरदवाड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेची पार्श्वभूमी अशी की, 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मानकापूर शिवारातील एका उसाच्या शेतात मंदार रानडे यांचा रक्ताच्या थारोळ्यात छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह शेतमजूर महिलांना आढळून आला होता. लग्न जुळवण्यात केली मदत पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक मगदूम याच्या 19 वर्षांच्या मुलीने 13 जानेवारी 2026 रोजी शिवनाकवाडी येथील ओंकार कोंचे याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. मंदार रानडे यांनी या लग्नाचे पौरोहित्य केले होते आणि लग्न जुळवून आणण्यास मदत केली होती. या कारणामुळे समाजात आपली बदनामी झाली असा राग आरोपीच्या मनात होता. याच सूडातून त्याने रानडे यांच्या हत्येचा कट रचला. नवीन लग्नाचे काम म्हणून संपर्क हत्येच्या दिवशी आरोपीने एका अनोळखी फोन नंबरवरून रानडे यांच्याशी संपर्क साधला. एका नवीन लग्नाचे काम असल्याचे सांगून त्यांना मानकापूर येथील शिवारात बोलावून घेतले. रानडे घटनास्थळी पोहोचताच आरोपीने प्रथम त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांना असहाय्य केले. त्यानंतर सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करून त्यांची हत्या केली. काही तासांत आरोपीला बेड्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले आणि उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीला शिरदवाड येथून अटक केली. तपासादरम्यान हत्येसाठी वापरलेला रक्ताने माखलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी केदार कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. निरपराध पुरोहिताच्या या निर्घृण हत्येमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महत्त्वाची माहिती आणि घटनाक्रम हत्येचे मूळ कारण पोलीस तपास आणि कारवाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *