Headlines

EMRS खैरी परसोडा शाळेची देशातील उत्कृष्ट पाच शाळांमध्ये निवड:राष्ट्रपतींच्या हस्ते आदिवासी विकास विभागाचे सचिव, नागपूर जिल्हाधिकारी व शाळेच्या प्राचार्यांचा होणार सन्मान




नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळा (ईएमआरएस), खैरी परसोडा हिची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे देशातील उत्कृष्ट पाच ईएमआरएस शाळांमध्ये निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या अनुषंगाने भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय बी. वाघमारे (भा.प्र.से.), नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) आणि शाळेच्या प्राचार्य श्रीमती रूपा बोरेकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती (NESTS) मार्फत देशभरातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शाळांच्या शैक्षणिक व संस्थात्मक कामगिरीचे मूल्यमापन कार्यप्रदर्शन निर्देशक (Key Performance Indicator – KPI) चौकटीच्या आधारे करण्यात येते. या राष्ट्रीय मूल्यमापनात खैरी परसोडा शाळेने उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम शैक्षणिक वातावरण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सचिव विजय बी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुक्त लीना बनसोड यांच्या प्रशासकीय नेतृत्वात तसेच अपर आयुक्त आयुषी सिंग यांच्या विभागीय समन्वयातून ईएमआरएस शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडून ईएमआरएस शाळांच्या प्रभावी कार्यासाठी आवश्यक प्रशासकीय समन्वय व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, प्राचार्य रूपा बोरेकर यांच्या शैक्षणिक नेतृत्वाखाली शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि संस्थात्मक विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. जनजातीय गौरव पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात ईएमआरएसच्या गुणवंत विद्यार्थ्यांना माननीय राष्ट्रपती महोदया यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याच कार्यक्रमात संबंधित अधिकाऱ्यांचा व प्राचार्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. खैरी परसोडा ईएमआरएस शाळेची राष्ट्रीय स्तरावर झालेली निवड ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य शासन, आदिवासी विकास विभाग, नागपूर जिल्हा प्रशासन आणि शाळा प्रशासन यांच्या समन्वित प्रयत्नांची गौरवपूर्ण दखल आहे. या उपलब्धीमुळे राज्यातील अन्य ईएमआरएस शाळांना शैक्षणिक गुणवत्ता, संस्थात्मक कार्यक्षमता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *