![]()
अशा दुष्काळी परिस्थितीत आम्ही घरी दिवाळी साजरी न करता, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबत साजरी करत आहोत. उद्याचे गोकुळ दूध संघासंदर्भातील आंदोलन अधिक तीव्र होईल. हे सरकार रडीचा डाव खेळत असून सर्व कामकाज संविधानविरोधी सुरू आहे. सरकारच्या विरोधात आलेला निकाल त्यांनी स्वीकारला पाहिजे. यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे विषय न वळवता विचार करून बोलावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, बारामती ॲग्रो’ने दारूचे उत्पादन थांबवून ते पाणी शेतकऱ्यांना द्यावे, अन्यथा बारामतीत धरणे आंदोलन करू, असा इशारा आमदार राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या टीकेला आज रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. कारखाने आणि डिस्टिलरी कशी चालते, याची साधी माहिती नसणाऱ्यांना मी काय उत्तर देणार? पाचवीचा विद्यार्थीही त्यांना उत्तर देऊ शकेल, त्यामुळे अशा लोकांना उत्तर देऊन मी माझा वेळ का वाया घालवू?. जयकुमार गोरेंवर अप्रत्यक्ष टीका रोहित पवार म्हणाले की, पालकमंत्री त्यांच्या सर्व बैठका ‘बालाजी सरोवर’मध्ये घेतात. ते सकाळ, दुपार, संध्याकाळ कष्ट करत आहेत. जास्त कष्ट केल्यावर माणसाला गोळ्या खाव्या लागतात, मी एवढेच बोललो, असा चिमटा त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना काढला आहे. अक्कलकोटमधील नागरिकही पाण्याच्या समस्येवर बोलत असून पालकमंत्र्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर स्पष्टीकरण रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या पक्षात अंतर्गत वाद असतील तर त्यावर मी काय बोलणार. अजित पवारांना दोन्ही कुटुंबे एकत्र असावीत असे वाटत होते. मात्र, दादांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी अवघ्या 10 दिवसांत राजकारण सुरू केले. दादा असते तर कदाचित विलीनीकरण झाले असते. तसेच, शरद पवार आजारी असल्याने काही लोक त्यांच्या भेटीला आले होते, मात्र काहींनी त्याला जाणीवपूर्वक राजकीय चर्चेचा रंग दिला. त्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगारावरून सरकारवर टीका रोहित पवार म्हणाले की, गुजरातमध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक होते आणि तिथे मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळतो. तशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स तुम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला द्या. एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांचा पराभव झाला. हे प्रकल्प मोठ्या प्रमाणात पाणी पितात, आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात आणि रोजगारही अत्यल्प देतात. दीड लाख कोटींची गुंतवणूक करून केवळ 400 नोकऱ्या मिळणार असतील, तर त्याचा काय उपयोग? हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो.
Source link
हे सरकार रडीचा डाव खेळत असून सर्व कामकाज संविधानविरोधी:कारखाने कसे चालतात हे नसणाऱ्यांना काय उत्तर देणार?; राऊतांच्या टीकेवर रोहित पवारांचा टोला