![]()
गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावर मोर्चा काढला पाहिजे असे म्हटले होते. त्यावर भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार केला आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी जर संजय राऊतांना मोर्चा काढायचाच असेल, तर तो ‘वर्षा’वर नाही, तर ‘मातोश्री’वर काढला पाहिजे,” असे बन म्हणाले. ‘लोकशाहीची हत्या उद्धव ठाकरेंनीच केली’ संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले, “जनाब संजय राऊत सांगत आहेत की वर्षावर मोर्चा काढला पाहिजे. पण, जर मोर्चा काढायचाच असेल, तर त्या मोर्चाची सुरुवात ‘मातोश्री’वरून झाली पाहिजे आणि तो तिथेच काढला पाहिजे. कारण, २०१९ साली लोकशाहीची हत्या करण्याचे काम स्वतः उद्धव ठाकरे यांनीच केले. लोकशाहीचा गळा घोटण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनीच सुरू केली होती.” २०१९ च्या बहुमताची करून दिली आठवण उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयावर बोट ठेवत बन पुढे म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले होते. पण, तुम्ही ते जनतेचे बहुमत नाकारले आणि सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन बसलात. त्यामुळे लोकशाहीचा मंत्र वाचवण्यासाठी मोर्चा काढायचा असेल, तर तो वर्षाऐवजी मातोश्रीवरच काढायला हवा.” ‘गोकुळमध्ये लोकशाहीचाच सन्मान होईल’ गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावर संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या चिंतेलाही नवनाथ बन यांनी उत्तर दिले. “गोकुळमध्ये लोकशाहीच्या मार्गानेच सत्ता येणार आहे. गोकुळमध्ये लोकशाहीचा पूर्ण सन्मान होईल. ज्यांचे सदस्य लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले आहेत, त्यांचीच सत्ता तिथे येईल, याबद्दल संजय राऊत यांनी अजिबात चिंता करू नये,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
————— हेही वाचा.. पवार भाजपसोबत जाणार हे बोलणारे मूर्ख, ते सुपारी घेऊन बोलतात: शिंदे अन् अजित पवार गटाचे भवितव्य दिल्लीतून ठरतेय- संजय राऊत
शरद पवार भाजपसोबत जाणार असे बोलणारे लोक मूर्ख आहेत, ते कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहेत. जे लोक शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले, ते का सोडून गेले? अजित पवार असते तर त्यांनी हा विषय काढलाच नसता, पण आज त्यांचा जो गट आहे, तो नेतृत्वहीन झाला आहे. पक्षाचे भवितव्य काय ठरवायचे, हे दिल्लीत अमित शहा ठरवत आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षाचे भविष्य अमित शहा ठरवत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा कोल्हापुरात सतेज पाटलांचा संघर्ष मोर्चा: गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध, मविआच्या घटक पक्षांचा मोर्चाला पाठिंबा
कोल्हापूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून आता मोठा संघर्ष पेटला आहे. गोकुळ दूध संघात सतेज पाटील गटाला बहुमत मिळालेले असताना, राज्य सरकारने अध्यक्ष निवडीसाठी अतिरिक्त ४ शासन नियुक्त संचालकांच्या वाढीचा अध्यादेश काढला आहे. या निर्णयामुळे अध्यक्षपद महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सरकारच्या या हस्तक्षेपाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’ने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, आज कोल्हापुरात भव्य ‘संघर्ष मोर्चा’ची हाक दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
गोकुळमध्ये लोकशाही मार्गानेच सत्ता येणार:संजय राऊतांनी चिंता करू नये, नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर