![]()
मलकापूरस्थित गायत्री बालिकाश्रम येथे जाणीव फाउंडेशनतर्फे सामाजिक दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात तानाजी सांगळे यांच्या ‘माझी कस्तुरी’चे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. मनुष्याच्या आयुष्यातील नाती, जिव्हाळा, आठवणी हाच खरा ठेवा असतो. माणसे आपल्यातून निघून गेली तरी त्यांच्या आठवणी, संस्कार, विचार कायम जिवंत राहतात. अशा साहित्यकृतींमधून माणुसकीची मूल्ये जपली जातात. पुढील पिढीला नात्यांचे महत्त्व समजते, असे प्रतिपादन मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सुनील लहाने होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, आरोग्य सेवा अकोला मंडळाच्या सहाय्यक उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, अंबाजोगाई येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीहरी नागरगोजे, गझलकार किशोर बळी, नांदेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीपराव फुगारे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी राम लठाड, लेखक तानाजी सांगळे, गायत्री बालिकाश्रमच्या अध्यक्षा मीरा जोशी, गणेश काळकर यांची उपस्थिती होती. जाणीव फाउंडेशन, अकोलाचे संस्थापक अध्यक्ष, लेखक, सेवानिवृत्त महसूल अधिकारी तानाजी सांगळे यांनी त्यांच्या दिवंगत अर्धांगिनी रेखा सांगळे यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘माझी कस्तुरी’ या पुस्तकाचे प्रकाशन अनाथ बालिका, रेखा सांगळे यांच्या आई मनकर्णाबाई घुगे, लेखकाची बहीण गोकरणा घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘माझी कस्तुरी’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील लिखाणाची वास्तवदर्शिता प्रकर्षाने जाणवते. लेखकाने रेखाताईंच्या जीवनातील संघर्ष, त्याग, समर्पण प्रभावीपणे मांडले आहे. प्रेरणाही देईल, असे प्रतिपादन डॉ. गजानन नारे यांनी केले. संघर्षमय जीवनप्रवासाचे भावस्पर्शी असे विश्लेषण प्रकाश अंधारे यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाच्या आशयाचे विश्लेषण केले. रेखाताईंच्या संघर्षमय जीवनप्रवासाचेही भावस्पर्शी शब्दांत विश्लेषण केले. हे लिखाण इतके वास्तववादी आहे की वाचक लेखकाच्या शब्दांशी एकरूप होतो. एका स्त्रीने केलेला संघर्ष, त्याग, समर्पण, सोसलेल्या वेदना वाचताना वाचकही त्या भावविश्वाचा भाग बनतो. हे पुस्तक एका स्त्रीच्या जीवनकहाणीपुरते मर्यादित राहत नाही. समस्त स्त्रीवर्गाच्या कष्टांना, त्यागाला, संघर्षाला समर्पित अशी ही साहित्यकृती आहे, असे त्यांनी नमूद केले.
Source link
साहित्यकृतींतून जपली आपल्या माणुसकीची मूल्ये:पुस्तकाच्या माध्यमातून शब्दरूप देण्याचा तानाजी सांगळे यांचा प्रयत्न समाजासाठी कौतुकास्पद