![]()
राजस्थानी समाजाच्या विकासासाठी सेवाभावी कार्य करणाऱ्या राजस्थानी सेवा संघाचा दीपावली स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रम रायली जीन येथील ओसवाल भवन येथे पार पडला. ओसवाल भवन ट्रस्टचे अध्यक्ष विनोद गोलेछा यांनी मनोगत व्यक्त केले. समाजाची सेवा करताना सामाजिक जबाबदारीचे पालन सातत्याने करावे. तरुण पिढीसाठी उद्योग व रोजगारनिर्मितीसारखे उपक्रम राबवावेत. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच ओसवाल महिला मंडळाकडून सामूहिक नवकार मंत्र जपाने करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष राजेश जैन होते. वक्ते म्हणून जालना येथील जीवनप्रेरक इंद्रकुमार गादिया उपस्थित होते. मंचावर सेवा संघाचे महासचिव नरेश बियाणी, आ. वसंत खंडेलवाल, माजी आ. बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, मनपा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल, ओसवाल भवन ट्रस्टचे अध्यक्ष विनोद गोलेछा, सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. मोतीसिंग मोहता, अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेंद्र खेतान, माहेश्वरी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष शांतीलाल भाला, खंडेलवाल समाजाचे संजय खंडेलवाल, खत्री समाजाचे दिलीप खत्री, सोनार समाजाचे कमलकिशोर वर्मा, राजपूत समाजाचे अॅड. सुभाषसिंह ठाकूर, जाट समाजाचे रमेश राजोरीया, सेन समाजाचे धनराज अजाडीवाल, जांगीड समाजाचे मंगेशकुमार जांगीड, जिनगर समाजाचे दीपक साकला, कुमावत बेलदार समाजाचे अध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल, क्षत्रिय समाजाचे अजय सेंगर, प्रजापत समाजाचे जगदीश प्रजापत, राजस्थानी ब्राह्मण समाजाचे विजय तिवारी, सेवा संघाचे माजी अध्यक्ष निकेश गुप्ता, मारवाडी युवा मंच शाखेचे अध्यक्ष जितेंद्र बोरा, रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, मारवाडी महिला संमेलनाच्या प्रांतीय अध्यक्ष उषा बाहेती तसेच अ.भा. मारवाडी महिला संमेलनाच्या शाखा अध्यक्ष संध्या अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत राका, निकिता बागरेचा यांनी केले. आभार प्रशांत कोठारी यांनी मानले. सामाजिक समस्येवर विचार होणे गरजेचे अध्यक्षीय मनोगतात सेवा संघाचे अध्यक्ष राजेश जैन यांनी समाजातील विविध सामाजिक विषयांवर भर दिला. आज समाजात लग्न करणाऱ्यांचे वय वाढत आहे. याचा परिणाम समाजाच्या लोकसंख्येवर होत आहे. या गंभीर सामाजिक समस्येवर समाजाच्या वरिष्ठ घटकांनी विचार करावा. त्यावर पारंपरिक व सुलभ मार्ग निघावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात वक्ते इंद्रकुमार गादिया यांनी व्याख्यान दिले.
Source link
राजस्थानी सेवा संघाचे दिवाळी स्नेहमिलन उत्साहात:तरुणाईसाठी उद्योग-रोजगार निर्मितीसारखे उपक्रम राबवणे आवश्यक- विनोद गोलेछा