Headlines

विधवा वृद्ध महिलांना फराळ, साडी-चोळी भेट




समाजातील निराधार, विधवा आणि गरजू वृद्ध महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवण्याच्या उद्देशाने आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘आनंदीग्राम’ उपक्रमांतर्गत यंदाही सलग चौथ्या वर्षी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एक दिवा आनंदाचा’ या संकल्पनेतून वृद्ध आजींना जीवनावश्यक वस्तूंचे किट, साडी-चोळी आणि दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला. उपक्रमासाठी गरजू व्यक्तींना अन्नदान व रक्तदान करणारा ग्रुप, शिवर, अकोला तसेच मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे आनंदिग्राममधील आजींच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. ‘हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती’ या काव्यपंक्तींतून प्रेरणा घेत आरोळी सामाजिक संस्था गत अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. गत तीन वर्षांपासून मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना येथील अजय किंगरे हे आनंदिग्राममधील आजींसाठी दिवाळीचा फराळ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने सहकार्य करीत आहेत. यंदाही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *