Headlines

सिल्लोडमध्ये मिरची 1500 हेक्टरपर्यंत वाढणार‎:गतवर्षी 5800 हेक्टर झाली होती लागवड, गेल्या वर्षी होता चांगला भाव‎




सिल्लोड तालुक्यात उन्हाळी मिरची लागवड जोमाने सुरू झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील आमठाणा अन्वी, केळगाव, मुर्डेश्वर, पानवडोद, शिवना, उंडणगाव, पालोद, मांडणा, हट्टी, पांगरी, अंभई, भराडी, लिहाखेडी, सारोळा, आसडी, गोळेगाव, रहिमाबाद, पिंपळदरी, बाळापूर, खुल्लोड, हळदा, डकला, बोदवड, सराटी, खंडाळा, आदी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करीत आहेत. उन्हाळ्यात एप्रिल महिन्यापासूनच या मिरची लागवडीस सुरुवात झाली आहे. पाण्याची बचत व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी मल्चिंग पेपर वापरत असल्याने यामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५८०० हेक्टरवर मिरची लागवड केली होती. या मिरची लागवडीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा झाल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कापूस, मका पिकाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी मिरची या नगदी पिकाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड शासनमान्य नर्सरीतूनच रोपे खरेदी करावी त्यानुसार वेळोवेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट त्यांचे बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांची मिरची रोपे घेण्यात फसवणूक होऊ नये, यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी शासनमान्य नर्सरीतूनच रोपे खरेदी करावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *