Headlines

‘भूमी अभिलेख’चा अधिकारी अटक:नाशिकच्या म्हाडा प्रकरणातील चाैथा संशयित सलग चौथा अधिकारी




म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परिरक्षण भूमापक श्रीकांत परदेशी यांना अटक करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखा युनिट-१ पथकाने इंदिरानगर येथे ही कारवाई केली. न्यायालयात हजर केले असता १० जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखा चे पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडा अपहार प्रकरणात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग निष्पन्न झाला. बहुतांशी प्रकरणात बनावट नकाशे, पोट हिस्से आणि फोड करताना कार्यालयात महत्त्वाच्या पदावर श्रीकांत परदेशी (रा. बी-१८, शिवमंगल पॅराडाईज अपार्टमेंट, इंदिरानगर) यांना अटक केली. फसवणूक आणि बेकायदेशीर कृत्य करण्याच्या मोठ्या कटात त्याचा थेट सहभाग तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय नोकरदार असल्याने, त्याच्या अटकेबाबतचे अधिकृत पत्र पोलीस प्रशासनाने तात्काळ ‘उपअधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक’ यांना पाठवले आहे. आतापर्यंत६ अटकेत या प्रकरणात आजपर्यंत, नगररचनाचे सहायक संचालक कल्पेश पाटील, या प्रकरणातील तक्रारदार तथा अधीक्षक बिपीन काजळे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *