Headlines

FDA ची राज्यभर धडक कारवाई:मुंबई क्रिकेट असोसिएशनसह 11 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित, 45 हॉटेल-रेस्टॉरंटची तपासणी




अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमवर कारवाई मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमची FDA अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला, प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ आणि घसरडी असल्याचे आढळले. तसेच FSSAI परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेला नव्हता. खाद्यतेलाची नियमित तपासणी केली जात नसल्याचेही निदर्शनास आले. कच्चा कृषी माल खराब अवस्थेत आढळला, तर कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या नियमांचे अपेक्षित पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला. कुर्ल्यातील मिड डे मिल कॅन्टीनमध्येही गंभीर त्रुटी कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या मिड डे मिल कॅन्टीनचीही तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा निकषांच्या तपासणीत या आस्थापनाला केवळ ४८ टक्के गुण मिळाले. अन्न तयार करण्याचा परिसर अस्वच्छ असल्याचे तसेच ठिकठिकाणी घाण, अन्नाचे अवशेष आणि अपुरी स्वच्छता आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले. भिंती, छत आणि इतर भागांवर डाग, ग्रीस व झीज दिसून आली. फरशी तुटलेली असून त्यावर पाणी आणि अन्नाचे अवशेष साचले होते. अन्नाच्या संपर्कात येणारी उपकरणे, भांडी आणि कंटेनरही अस्वच्छ तसेच काही ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत आढळले. खाद्यपदार्थ आणि कच्चा माल योग्य पद्धतीने साठवला नसल्याचेही तपासणीत समोर आले. शिवाजी पार्कमधील कॅफे कॅडेलाचा परवाना निलंबित दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेल येथेही FDA अधिकाऱ्यांनी तपासणी केली. किचनमध्ये अस्वच्छता, दरवाजांची खराब अवस्था आणि किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आढळला. कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांमध्येही त्रुटी आढळल्या. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. FDA कडून राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढेही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा.. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *