Headlines

विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस:तालुक्यात रक्कम वसुलीचा धाक दाखवताच अनेकांनी बुजवले खड्डे‎



सिल्लोड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील डांबरी रस्त्यांवर पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे फोडाफोडी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. या नियमबाह्य खोदकामामुळे ग्रामीण भागातील रस्ते उखडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे

.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे. रस्ते पूर्ववत न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा मिळताच विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे स्वतःहून बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवीन रस्त्यांची चाळण; वाहनधारक त्रस्त तालुक्यातील महत्त्वाची खेडी आणि मुख्य बाजारपेठेची गावे जोडणाऱ्या नवीन व जुन्या डांबरी रस्त्यांची बेसुमार फोडाफोडी करण्यात आली आहे. नियमानुसार कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, अनेक ठिकाणी विनापरवाना रस्ते फोडण्यात आले. परिणामी, नुकतेच लाखो रुपये खर्चून तयार केलेले नवीन डांबरी रस्ते खराब झाले असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे भरधाव वेगातील वाहने आदळून मोठे अपघात घडत आहेत, ज्यामध्ये अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे गजानन दळवी यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगानेच आता ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नुकसान भरपाई वसूल करणार Ãसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारितील सर्वच रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही सविस्तर अहवाल तयार केला आहे. अनेक ठिकाणी विनापरवानगी रस्ते खोदल्याचे समोर आले आहे. संबंधितांना रस्ते तातडीने दुरुस्त करण्याच्या नोटीस आणि सूचना दिल्या आहेत. तसे न केल्यास त्यांच्याकडून थेट नुकसान भरपाई वसूल केली जाईल. यापुढे विनापरवानगी रस्ता खोदल्यास कोणतीही गय न करता थेट फौजदारी कारवाई केली जाईल. -विजय सोनवणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिल्लोड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *