Headlines

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎



तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा

.

बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात केवळ त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुली होत्या. हीच संधी साधून माथेफिरूंनी रात्री १२ ते २ च्या सुमारास घरासमोर लावलेल्या बांबूंच्या ढिगाऱ्याला आग लावली. तसेच, शेतातील डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली आणि शेडनेटचे आच्छादनही फाडून टाकले. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात व कृषी विभागास कळविण्यात आले आहे. शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान करणारे हे अज्ञात समाजकंटक आरोपींना शोधून गजाआड करण्याचे आव्हानात्मक काम पोलीस यंत्रणेकडून अपेक्षित आहे.

पत्नी आणि मुलींच्या सतर्कतेने वाचले घर बांबू जळताना होणारा तडतड आवाज ऐकून कुमकर यांच्या पत्नी बाहेर आल्या, तेव्हा त्यांना आगीचे रौद्र रूप दिसले. त्यांनी तातडीने लहान मुलींना जागे केले आणि विठ्ठल कुमकर यांना फोन करून माहिती दिली. शेजारील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाणी उपसा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बांबू जळून राख झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *